नुकसानीच्या मदतीसाठी जुनेच निकष

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

यवतमाळ : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने (Heavy Rain) जिल्ह्यात खरीप हंगामातील (Kharif Season Crop) कापूस, सोयाबीन (Soybean), तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात नुकसानीचा (Damage) आकडा तीन लाख २० हजार हेक्टरवर पोहोचला आहे. त्यासाठी २११ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आला. मदतीसाठी सात वर्षांपूर्वीचे जुनेच निकष असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडणार आहे.

Crop Damage
Crop Damage : समृद्धी महामार्गावरील पाणी शेतात; पिकांचे नुकसान

जिल्ह्यात खरीप हंगामात नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचा यात समावेश आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण मदार याच हंगामावर असते. या हंगामात शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली. त्यातच शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीची वेळ आली. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे स्वप्नच मातीत मिसळले. नदी-नाल्यातील पाणी शेतात शिरल्याने शेतशिवार जलमय झाले. सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत असतानाच जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले. कर्मचाऱ्यांनी कसेबसे संथगतीने पंचनामे पूर्ण केले.

Crop Damage
Crop Damage : अमरावती जिल्ह्यातील ३१ टक्के क्षेत्रातील खरीप बुडाला

जिल्हाभरात तीन लाख दहा हजार २९३ शेतकऱ्यांच्या तीन लाख एक हजार ७०६ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी २०५ कोटी रुपये, तर खरडून गेलेल्या शेतीसाठी सहा कोटी असा एकूण २११ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो आयुक्तांकडे पाठविण्यात आला. विशेष म्हणजे खते, बियाणे, वाहतूक, मजुरी अशा प्रकारच्या सर्वच खर्चात वाढ झाली आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांना जुन्याच म्हणजे २०१५ च्या निकषानुसार मदत दिली जाते.

कोरडवाहूसाठी सहा हजार ८००, तर ओलित १३ हजार ५०० रुपये प्रती दोन हेक्टर क्षेत्राची मदतीसाठी मर्यादा आहे. जिल्ह्यात जास्त जास्त शेतकरी कोरडवाहू शेती करणारे आहेत. हा हंगाम त्यांच्या हातातून निघून गेला आहे. प्रती दोन हेक्टरी मदत मिळाल्यास१३ हजार ६०० रुपये इतकीच मदत त्यांच्या हातात पडू शकते. त्यातून दिलासा मिळण्याऐवजी तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होणार आहे. त्यातही ही मदत वेळेत मिळण्याची शक्यताही धुसरच आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नव्याने निकष अमलात आणण्याची गरज आहे.

तालुकानिहाय बाधित क्षेत्र

यवतमाळ-११३.३५

कळंब-१४,१५६.४५

घाटंजी-३०,७२७

राळेगाव-३५,६८५

नेर-२,५१२

आर्णी-२६,३९०

बाभूळगाव-५,०८४

पुसद-१५५

दिग्रस-८१०

उमरखेड-३२,५९२

महागाव-२४,७२५

पांढरकवडा-३४,८७२

वणी-४४,२३९

मारेगाव-२५,७३७

झरी-२३,७३६

अतिवृष्टीने तीन लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. शेतजमीनही खरडून गेली आहे. त्यासाठी एकूण २११ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. वेळेवर येणाऱ्या सूचनांचे पालन केले जाईल.

- नवनाथ कोळपकर

जिल्हा कृषी अधीक्षक, यवतमाळ.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com