पहिल्या दिवशी कृषी अधिकारी पोहोचले १२२ गावांत

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषिमंत्र्यांनी घोषित केलेल्या उपक्रमाची गुरुवारपासून (ता. १) सुरुवात करण्यात आली.
Dheeraj Kumar
Dheeraj KumarAgrowon

औरंगाबाद :‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ (Maza Ek Divas Balirajasathi) या कृषिमंत्र्यांनी घोषित केलेल्या उपक्रमाची गुरुवारपासून (ता. १) सुरुवात करण्यात आली. त्याअंतर्गत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील मंडळ कृषी अधिकारी ते विभागीय कृषी सहसंचालकापर्यंत अधिकाऱ्यांनी १२२ गावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Dheeraj Kumar
Cotton Production : अमेरिकेतील कापूस उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार?

औरंगाबाद मधील ३९, बीडमधील ४८ व जालनामधील ३५ गावांचा मंडळ कृषी अधिकारी ते विभागीय कृषी सहसंचालकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी भेट दिलेल्या गावांचा समावेश आहे. औरंगाबादचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबादचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांच्यासह नरसापूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद, तर औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी पी. आर. देशमुख यांनी खंडाळा, ता. सिल्लोड गावांना प्रत्यक्ष भेट दिली.

सुलभ आणि प्रभावी कृषिविषयक धोरण तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व प्रश्‍न प्रशासनाने समजून घेणे, त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. या उपक्रमाचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत उपक्रम चालणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतावर व ग्रामीण भागात राहून त्यांचे दैनंदिन शेतीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणीवर त्यांचे सोबत त्यांच्या विविध कामांत सहभागी होऊन चर्चा करणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात एका दिवसात किमान ३०० कोरडवाहू गावांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीचे नियोजन केल्याचे देशमुख यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

कृषिमंत्र्यांनी घोषित केलेल्या उपक्रमाला अनुसरून कृषी विभागाने नियोजन केले आहे. उपक्रमांती अपेक्षित अहवाल कृषिमंत्र्यांना सविस्तरपणे सादर केला जाईल.
डॉ. डी. एल. जाधव, विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com