पोळ्यानिमित्त आठवडी बाजार सजले

मागील दोन वर्षे कोरोनामुळे बैलपोळा या सणालाही फटका बसला होता. यंदा परिस्थिती चांगली असल्याने सर्वत्र आठवडी बाजार भरत आहेत.
बैलपोळा
बैलपोळाAgrowon

साखरखेर्डा, जि. बुलडाणा : मागील दोन वर्षे कोरोनामुळे बैलपोळा (Bailpola) या सणालाही फटका बसला होता. यंदा परिस्थिती चांगली असल्याने सर्वत्र आठवडी बाजार भरत आहेत. या बाजारांमध्ये बैलांच्या सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दुकाने लागत आहेत. येथील आठवडी बाजारात आलेल्या या दुकानांवर मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

बैलपोळा
Cotton : गुलाबी बोंडअळीला कसं रोखाल?

बैल सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या भावात यंदा वाढ झालेली दिसून आली. यावर्षीचा बैलपोळा शुक्रवारी (ता.२६) आहे. त्यामुळे या भागातील आठवडी बाजारांमध्ये खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग आहे.

बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या वेसण, झूल, गोंडे, घुंगरू, घुंगरमाळा, कवड्यांच्या माळा, आरसे साहित्यांची विक्री सुरू आहे. यंदा या साहित्याचा दर २० ते २५ टक्के वाढलेला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी (ता. २५) खांदे मळणी होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com