या जन्मावर, या जगण्यावर...

हा  जन्म एकदाच आहे. मिळालेले प्रत्येक क्षण हे आयुष्यातले शेवटचे क्षण आहे असं मानलं तर आपण भरभरून जगू.
life
lifeAgrowon

हा  जन्म एकदाच आहे. मिळालेले प्रत्येक क्षण हे आयुष्यातले शेवटचे क्षण आहे असं मानलं तर आपण भरभरून जगू. भूतकाळ आणि भविष्याचा विचार करत आत्ताचे क्षण जर वाया घालत असू तर मग काय उपयोग? जगण्याचा खरा अर्थ उमगणारे प्रत्येक क्षणाचा आनंद लुटतात.

life
Lumpy Skin : लसीनंतरही ‘लम्पी स्कीन’ ने रोज ५० जनावरांचा मृत्यू

कितीही वाईट परिस्थिती आली तरी डगमगत नाहीत आणि हीच माणसं खऱ्या अर्थाने सुंदर जीवन जगतात. काहीही होवो मातीत पाय घट्ट रोवून ही माणसं उभी असतात. कुठलंही वादळ यांना हालवू शकत नाही. अशी माणसं आपल्या परिवारात असतील, परिचयाची असतील तर त्यांचा आपल्याला खूप मोठा आधार वाटतो.

सतत नकारात्मक बोलत राहिल्यामुळे विविध आजार आपल्या शरीरावर आक्रमण करतात. आपण पुन्हा त्या आजारपणावर बोलण्यानं आपल्या मनावरील ताण वाढतो. आजार कमी होण्याऐवजी वाढतो आणि मनाने एकदा आजाराविषयी मनावर घेतलं, की मग कुठल्याही डॉक्टराचं निदान उपयोगी पडत नाही.

कोरोना काळातही आपण अनुभवलं, की नकारात्मक चर्चेमुळे, स्वतःच्या मानसिक शक्तीच्या कमतरतेमुळे आणि सुविधांच्या अभावामुळे अनेकांचा जीव वाचवण्यात यश आले नाही.मानवी आयुष्यात प्लासीबो इफेक्टचा परिणाम खूप आहे. प्लासीबो इफेक्ट म्हणजे, रुग्णाची चिंता शमवण्यासाठी औषध म्हणून दिलेले परंतु औषध नसलेले असे काही परिणाम.

उदा. एकदा एका किरकोळ आजारी असलेल्या रुग्णावर प्लासीबो इफेक्टचा प्रयोग करायचा होता. तेव्हा गोळ्या म्हणून साखर वेगळ्या पद्धतीने देण्यात आली आणि तो रुग्ण ठणठणीत बराही झाला. त्या रुग्णाला ते औषध वाटले पण ते औषध नव्हतेच मुळी. म्हणून कुठलाही आजार बरा करण्यासाठी मनाचा आत्मविश्‍वास फार गरजेचा आहे.

life
Crop Damage : रत्नागिरीत ५० हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान

काही डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांच्या आत्मविश्‍वासपूर्ण बोलण्याने ९० टक्के आजार बरा झालेला असतो. म्हणजे आपलं मन एकाग्रतेनं डॉक्टराचं म्हणणं मान्य करतं आणि आजाराला दूर पळवतं. अशा या सुंदर जन्मावर, जगण्यावर आपण मनापासून प्रेम करावं.

भय, चिंता सोडून द्यावं. कारण आनंदाकडे आनंद येतो, दुःखाकडे दुःख. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात मनाविरुद्ध झाल्या त्याकडे दुर्लक्ष करावं. आणि जे आपल्या आयुष्यात चांगलं झालं त्याविषयी कृतज्ञता बाळगावी. कृतज्ञतेमुळे आपलं जीवन सुंदर बनतं. आपण कसं जगावं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. मिळालेला क्षण हा उत्सवासारखा जगण्याची सवय लागली, की जीवनातला आनंद द्विगुणित होतो आणि या जगण्यावर शतदा प्रेम करावसं वाटतं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com