लाचखोर अभियंत्याच्या घरातून दीड कोटी रुपये जप्त

आदिवासी विकास विभागातील सार्वजनिक बांधकामाचा लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल यांच्या नाशिकमधील घरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला.
Bribe
Bribe Agrowon

नाशिक : आदिवासी विकास विभागातील सार्वजनिक बांधकामाचा लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल (Dineshkumar Bagul) यांच्या नाशिकमधील घरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. त्या वेळी लाचेच्या रकमे व्यतिरिक्त ९८ लाख, तर पुण्यातील घरातूनही ४५ लाख रुपये अशी सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. दरम्यान, बागूल यांना (ता.२६)न्यायालयाने रविवारपर्यंत (ता.२८) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Bribe
Bribe : लाचखोर महिला तलाठीस तीन वर्षे सश्रम कारावास

बागूल यांच्या नशिकसह पुणे आणि धुळ्यात स्थावर व जंगम मालमत्ता आहेत. त्यांचे मूल्य कोट्यवधींच्या घरात असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. त्यात जमिनी, आलिशान फ्लॅटसचा समावेश आहे. मुंबईतील आर.के.इन्फ्रा. कॉन्स्ट्रो प्रा.लि.या फर्मला हरसूल येथे आदिवासी विकास विभागांतर्गत मुलामुलींच्या वसतिगृहासाठी सेंट्रल किचनचे काम सुरू करण्यासाठी कार्यारंभ आदेश द्यायचा होता. त्याबदल्यात बागूल यांनी २ कोटी ४० लाख रुपयांच्या कामाच्या रकमेच्या १२ टक्क्यांप्रमाणे २८ लाख ८० हजार रुपये लाच गुरुवारी (ता.२५) रात्री तिडके कॉलनीतील ‘नयनतारा’ या आलिशान सोसायटीतील घरातच तक्रारदाराकडून स्वीकारली.

Bribe
Bribe : पंधरा हजाराची लाच घेताना कृषी अधिकाऱ्याला अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, अपर अधिक्षक नारायण न्याहाळदे यांच्या सूचनेनंतर पथकाने सापळा रचला होता. कारवाईवेळी भेदरलेल्या बागूलने हातातील एक बॅग फेकून दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेनंतर पथकाने ती बॅग ताब्यात घेतली. त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यात संशयास्पद कागदपत्रे व काही दस्तावेज आढळले. त्याचा तपास केला जात आहे.

फेकलेल्या बॅगेत कागदपत्रे

लाचखोर बागूल याने लाचलुचपत विभागाकडून छापा पडताच फ्लॅटच्या गॅलरीतून खाली एक बॅग केली होती. या बॅगेची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला मिळाली. ती बॅग पथकाने वॉचमनकडून ताब्यात घेतली. त्यात कागदपत्रे आढळून आली. त्यांची तपासणी पथकाकडून केली जात आहेत. या कारवाईत बागूल यांच्या नाशिक येथील घरातून ९८ लाख ६३ हजार ५०० रुपये, तर पुण्यातील घरातून ४५ लाख रुपये ४० हजार रुपये असे एक कोटी ४३ लाख ६७ हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे.

कारवाईत जप्त दस्तावेज व कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. चौकशीतून आणखीही काही माहिती मिळू शकते.
नारायण न्याहळदे, अपर अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com