Sugarcane Crushing : पुणे विभागात एक कोटी सहा लाख टन उसाचे गाळप

पुणे विभागातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जवळपास मध्यावर आला आहे. सहकारी आणि खासगी अशा एकूण ३० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे.
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon

पुणे ः पुणे विभागातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) जवळपास मध्यावर आला आहे. सहकारी आणि खासगी अशा एकूण ३० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत एक कोटी ६ लाख २२६ टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) केले आहे. त्यातून ९९ लाख २८ हजार ३२८ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, साखर उतारा (Sugar Recovery) सरासरी ९.३७ टक्के एवढा आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : मराठवाड्यात ७३ लाख टन उसाचे गाळप

यंदा पावसामुळे साखर कारखान्याच्या गळीत हंगामात सुरुवातीच्या काळात काहीशा अडचणी आल्या होत्या. त्यानंतर गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. पुणे विभागात सातारा, पुणे जिल्ह्यात उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : सातारा जिल्ह्यात ३९ लाख टन उसाचे गाळप

गेल्या वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे उसाच्या तीन लाख हेक्टरपर्यंत लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे दोन लाख ७४ हजार १९६ हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे. शासनाने १५ आक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते.

सध्या सुरू असलेल्या कारखान्यामध्ये सहकारी १७ व खासगी १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख ७३ हजार ५० टन एवढी आहे. विभागात आत्तापर्यंत ३० कारखान्यांनी ६७ लाख ३८ हजार टन उसाचे गाळप केले आहे. आत्तापर्यंत झालेल्या गाळपामध्ये बारामती अॅग्रो कारखान्याने सर्वाधिक आघाडी घेतली तरी कराडमधील रयत सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे.

या कारखान्याचा ११.४२ टक्के एवढा साखर उतारा आहे. विभागात सहकारी साखर कारखान्यांनी ५४ लाख ६२ हजार १३८ टन उसाचे गाळप केले. त्यातून ५३ लाख ५७ हजार ६६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तर साखर उतारा सरासरी ९.८१ टक्के एवढा होता. खासगी साखर कारखान्यांनी ५१ लाख ३८ हजार ८८ टन उसाचे गाळप केले. त्यातून ५४ लाख ७० हजार ६६८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. साखर उतारा सरासरी ८.९० टक्के एवढा होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com