हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील एक लाख शेतकरी बाधित

यंदाच्या जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील पीक नुकसान क्षेत्राची व्याप्ती वाढली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

हिंगोली ः यंदाच्या जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टी (Heavy Rain) तसेच सततच्या पावसामुळे झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील पीक नुकसान (Crop Damage) क्षेत्राची व्याप्ती वाढली आहे. सर्व पाच तालुक्यांतील १ लाख ९ हजार ६४२ शेतकऱ्यांच्या ८८ हजार ३०१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. शेतकऱ्याना मदतीसाठी ६३ कोटी ८३ लाख २७ हजार रुपये २०० रुपये निधी अपेक्षित आहे.

Crop Damage
Crop Insurance : सांगलीत पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

जिल्ह्यात जून जुलै महिन्यात ३९९.४ मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु यंदा प्रत्यक्षात ६०३ मिमी (१५१ टक्के) पाऊस झाला. सर्व पाच तालुक्यातील मंडलात अनेकदा अतिवृष्टी झाली. नाले, ओढे, नद्यांच्या पुरामुळे जमिनी खरडून गेल्या. पिके, शेती अवजारे, सिंचन संच वाहून गेले. वसमत, कळमनुरी या दोन तालुक्यांतील नुकसानीचे क्षेत्र जास्त आहे. त्यानंतर औंढा नागनाथ, हिंगोली, सेनगाव या तालुक्यांचा क्रम आहे. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांच्या बाधित क्षेत्रात सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी आदी जिरायती पिकांचे सर्वाधिक म्हणजे ८३ हजार २४ हेक्टर एवढे आहे. त्यात वसमत तालुक्यातील ३७ हजार ५२१ हेक्टर, कळमनुरी तालुक्यातील ३३ हजार ६४२ हेक्टर, औंढा नागनाथ तालुक्यातील ५ हजार २५० हेक्टर, हिंगोली तालुक्यातील ४ हजार १३१ हेक्टर, सेनगाव तालुक्यातील २ हजार ४८० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

हळद, ऊस आदी बागायती पिकांचे बाधित क्षेत्र ४ हजार ७१६ हेक्टर आहे. त्यात वसमत तालुक्यातील ३ हजार ५०० हेक्टर आणि कळमनुरी तालुक्यातील १ हजार २१६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. फळपिकांचे ५६१ हेक्टर बाधित क्षेत्र वसमत तालुक्यात आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीकरिता जिरायतील क्षेत्रातील पिकांसाठी ५६ कोटी ४५ लाख ६३ हजार २०० रुपये, बागायती पिकांसाठी ६ कोटी ३६ लाख ६६ हजार रुपये, फळपीकांसाठी १ कोटी ९८ हजार रुपये मिळून एकूण ६३ कोटी ८३ लाख २७ हजार २०० रुपये निधी अपेक्षित आहे. अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

.........

तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये) निधी (कोटी रुपये)

तालुका...बाधित क्षेत्र....शेतकरी संख्या...अपेक्षित निधी

वसमत...४१५८२...४७३७६...३१.२४

कळमनुरी...३४८५८...३९८८०...२४..५१

औंढा नागनाथ...५२५०...११६७०...३.५७

हिंगोली...४१३१...५९९४...२.८०

सेनगाव...२४८०...४७२२...१.६८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com