Maharashtra Political Crisis : एक पक्ष दोन व्हीप : शिवसेनेत संभ्रम

सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी जारी केलेला हा व्हीप शिवसेनेच्या सर्व आमदारांना लागू असणार आहे. त्यामुळे बंडखोर गट काय करणार, याची उत्सुकता आहे. प्रभू यांचा व्हीप जर दोन तृतीयांशपेक्षा जास्त सदस्यांनी नाकारला तर ती फूट वैध ठरू शकते.
Thackeray & Shinde
Thackeray & ShindeAgrowon

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध शिवसेना (Shivsena) यांच्यातील विधानभवनातील पहिला सामना हा रविवारी (ता.३ जुलै) होणार आहे. ३ आणि ४ जुलै रोजी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. ३ जुलै रोजी दुपारी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. ४ जुलै रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दरम्यान शिवसेनेत एक पक्ष आणि दोन व्हीप अशी अवस्था असल्याने कोणाचा व्हीप कोणाला बंधनकारक असणार? असा पेच निर्माण झाला आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी शिंदे -फडणवीस यांच्या नव्या सरकारने राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी दिली. विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे राजन साळवी आणि नार्वेकर यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत होणार आहे. दरम्यान शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व आमदारांनी साळवी यांना मतदान करावे, असा व्हीप जारी केला.

Thackeray & Shinde
Maharashtra Politics:विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकर विरुद्ध साळवी

सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी जारी केलेला हा व्हीप शिवसेनेच्या सर्व आमदारांना लागू असणार आहे. त्यामुळे बंडखोर गट काय करणार, याची उत्सुकता आहे. प्रभू यांचा व्हीप जर दोन तृतीयांशपेक्षा जास्त सदस्यांनी नाकारला तर ती फूट वैध ठरू शकते. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा गट हीच खरी शिवसेना असून तेवढे संख्याबळ त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी जारी केलेला व्हीप हा शिवसेनेच्या इतर सदस्यांना लागू राहील, असे त्या गटाचे प्रवक्ते दीपक क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Thackeray & Shinde
Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी

विशेष अधिवेशनासाठी शिंदे गटाचे आमदार मुंबईत रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वतः त्यांना आणण्यासाठी गेले होते. तब्बल ११ दिवसांनी हे आमदार राज्यात परत येताहेत. गोव्यामधून विशेष विमानाने त्यांना महाराष्ट्रात आणण्यात येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईत तयारी करण्यात आली. कडेकोट बंदोबस्तात हे आमदार मुंबई विमानतळावरून ताज हॉटेलमध्ये रवाना होणार आहेत. या ठिकाणी भाजपसोबत त्यांची बैठक होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर या बैठकीत खल होणार आहे.

दरम्यान शिवसेनेकडून आज शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या कारवाईला कायदेशीर आव्हान देण्यात येणार असल्याचे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com