Andheri Bypoll : अंधेरीत लटकेंचा एकतर्फी विजय

आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आणि शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्याच पोटनिवडणुकीत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी तब्बल ६६ हजार ५३० मते मिळवत विजय मिळविला.
by-election
by-electionAgrowon

मुंबई : आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आणि शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्याच पोटनिवडणुकीत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Krutuja Latke) यांनी तब्बल ६६ हजार ५३० मते मिळवत विजय मिळविला. तर ठाकरे गटाने (Udhhav Thackeray) आरोप केल्याप्रमाणे भाजपने (BJP) नोटासाठी प्रचार केल्याचा परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळाला. १२ हजार ८०६ मते नोटाला मिळाली तर अपक्षांनी किरकोळ मते मिळवत आपले डिपॉझिट गमावले.

by-election
Crop Damage : तूर अन् ज्वारीलाही बसला अतिपावसाचा फटका

अंधेरी पूर्व मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके याच्या निधनानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर प्रचारही सुरू केला होता. मात्र अचानक ही उमेदवारी मागे घेण्यात आली होती.

ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे चिन्हाबाबत याचिका दाखल करत चिन्ह गोठविण्याची मागणी केली होती. त्यानुसार ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिले होते. चिन्ह गमावलेली शिवसेना या निवडणुकीत उतरली होती. तर भाजपनेही कंबर कसली होती, मात्र अनपेक्षित हालचाली होत मुरजी पटेल यांनी माघार घेतली.

तरीही बाला नाडार, मनोज नायक, नीना खेडकर, फरहाना सय्यद, मिलिंद कांबळे आणि राजेश त्रिपाठी हे अपक्ष उमेदवार रिंगणात होते. यातील कांबळे यांना सर्वात कमी ६२४ तर राजेश त्रिपाठी यांना १५७१ मते मिळाली. लटके यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवली. सकाळी आठला सुरू झालेल्या पहिल्या फेरीत लटके यांना ७ हजार ७१७, तर नोटाला १४७० मते पडली.

नोटाच्या मतांचा आकडाही फेरीगणिक वाढत जाऊन १९ व्या फेरीअखेर १२ हजार ८०६ झाला तर लटके यांच्या मतांची घोडदौड फेरीगणिक वाढत गेली. त्यांना ६६ हजार ५३० मते मिळाली. या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्याने चुरस संपली. त्यामुळे अवघे ३१. ७४ टक्के मतदान झाले होते. दोन लाख ७१ हजार मतदारांपैकी केवळ ८५ हजार ६९८ मतदारांनी मतदान केले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com