Beed Apmc Election : बीड जिल्ह्यात नऊ बाजार समित्यांची एकदाच निवडणूक

बाजार समित्या निवडणुकीसाठी सोमवार (ता. २७) पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु झाली ती ३ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
Beed Apmc Election
Beed Apmc ElectionAgrowon

Beed Election News : बीड जिल्ह्यातील १० पैकी ९ बाजार समित्यांच्या निवडणुका (Market Committee Elections) प्रथमच एकाच वेळी होत आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री सुरू असून २९ मार्चपर्यंत ७ बाजार समित्यांमध्ये १०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

बाजार समित्या निवडणुकीसाठी सोमवार (ता. २७) पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु झाली ती ३ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

२९ मार्चपर्यंत दाखल झालेल्या अर्जांमध्ये वडवणी बाजार समितीमध्ये ३, अंबाजोगाई १६, बीड २३, केज १६, माजलगाव १७, गेवराई २६ तर परळी बाजार समितीसाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

Beed Apmc Election
Mumbai APMC : अपात्र संचालकांची सुनावणी १८ जुलै रोजी होणार

जिल्ह्यातील दहा पैकी गेवराई वगळता उर्वरित नऊ बाजार समित्यांवर सहकार विभागाने प्रशासक नेमले होते. तर धारुर बाजार समितीची निवडणूक न्यायालयाच्या निर्देशाने पार पडली.

आता राज्य सहकारी प्राधिकरण पुणे यांच्या आदेशाने बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, केज, वडवणी, माजलगाव, पाटोदा व कडा या बाजार समित्यांच्या निवडणूक होणार असल्याची माहिती, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) समृत जाधव यांनी दिली.

निवडणूक अधिकारी म्हणून खुद्द समृत जाधव असून अपर जिल्हाधिकारी उत्तम पाटील जिल्हा निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

९ बाजार समित्यांपैकी माजलगाव व पाटोदा बाजार समित्यांसाठी ३० एप्रिल रोजी मतदान व त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. तर इतर बाजार समित्यांसाठी २८ एप्रिलला मतदान होऊन २९ एप्रिलला मतमोजणी व निकाल जाहीर होईल.

वडवणी व परळी बाजार समित्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संबंधित तहसीलदार काम पाहतील. तर, त्या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी निरीक्षक असतील. या दोन्ही तालुक्यांचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) पद रिक्त असल्याने ही जबाबदारी तहसिलदारांवर आहे.

Beed Apmc Election
Beed News : वीट उद्योगासाठी ‘क्लस्टर’ उभारणार : धनंजय मुंडे

उर्वरित बाजार समित्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहनिबंधक (सहकारी संस्था) यांच्यावर जबाबदारी असून संबंधित तालुक्यांचे तहसीलदार निरीक्षक म्हणून काम पाहतील.

बीड बाजार समिती निवडणुकीसाठी उपनिबंधक श्री. परदेशी, माजलगावला विकास जगदाळे, गेवराईला श्रीमती कदम, कडाला बाळकृष्ण शिंदे, पाटोदासाठी श्री. केदार, केजसाठी श्री. मोटे, अंबाजोगाईसाठी श्री. पोतलंगे हे निवडणूक निरीक्षक असतील.

पारदर्शक पद्धतीने व सुरळीत निवडणुका होण्यासाठी सहकार विभागाने पूर्णतयारी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह निरीक्षक काम पाहत आहेत.
समृत जाधव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com