Sugarcane FRP : मागणीनुसार एकरकमी एफआरपी देऊ

आम्ही एकरकमी ‘एफआरपी’बाबत यापूर्वीही स्पष्ट केले आहे; मात्र एफआरपी तीन हप्त्यांत द्यावी, अशी ‘क्रांती’च्या सभासदांचीच मागणी आहे.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon

कुंडल, जि. सांगली ः आम्ही एकरकमी ‘एफआरपी’बाबत (One Time Sugarcane FRP) यापूर्वीही स्पष्ट केले आहे; मात्र एफआरपी तीन हप्त्यांत (FRP In Installment) द्यावी, अशी ‘क्रांती’च्या सभासदांचीच मागणी आहे. जे शेतकरी एकरकमी एफआरपीची मागणी करतील, त्यांना एकरकमी देऊ, अशी माहिती आमदार अरुण लाड (Arun Lad) यांनी दिली.

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या २६ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार लाड बोलत होते. उपाध्यक्ष उमेश जोशी, उद्योजक उदय लाड, क्रांती दूध संघाचे किरण लाड, दिलीप लाड, जिल्‍हा परिषद सदस्‍य शरद लाड, जयवंत कुंभार, निवृत्ती पाटील, प्रशांत चौगुले यांच्यासह कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्‍हाणे, सचिव अप्‍पासाहेब कोरे उपस्थित होते.

आमदार लाड म्हणाले, की गेल्या वर्षी केवळ ३५ शेतकऱ्यांनीच एकरकमी एफआरपी नेली. राज्यातील एफआरपीपेक्षा जास्त दर देणारा कारखाना ‘क्रांती’ आहे. यावर्षी एफआरपीपेक्षा ८० रुपये जास्त रक्कम शेतकऱ्यांना देत आहोत.

Sugarcane FRP
Sugarcane Crushing : यंदाच्या हंगामात किती ऊस गाळपासाठी उपलब्ध ?

यातील ४० रुपये भागविकास निधी व उर्वरित ४० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दीपावलीपूर्व जमा करत आहोत. कारखान्याची २९७५ रुपये एफआरपी असताना या वेळी शेतकऱ्यांना ३०५५ रुपये देत आहोत. आजवर कारखान्याने शेतकऱ्यांना जशी हवी तशी एफआरपी दिली आहे.

Sugarcane FRP
Sugarcane Protest : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बेंगलोर येथे आंदोलन

यापूर्वी बहुतांश ऊस उत्पादकांनी तीन हप्त्यांत एफआरपीची रक्कम द्यावी, असे सांगितले, त्यानुसार दिली आहे. आज रोजी १४ हजार एकर ऊस नोंद आहे. यातून आपण १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

शासनाने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ३६०० रुपये करावा. कारखान्‍याने शेतकऱ्यांची, बँकांची देणी व कर्मचाऱ्यांच्या बोनससह पगार व तोडणी वाहतूक कमिशन डिपॉझिट अशी सर्व देणी वेळेत दिली आहेत. दिलीप पार्लेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com