Election : ‘पदवीधर’च्या परवानग्यांसाठी ‘एक खिडकी’ची सुविधा

उमेदवार किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना या कामी नेमलेल्या सक्षम अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आवश्यक त्या परवानग्या तत्काळ देण्यात येतील.
Graduate Election
Graduate ElectionAgrowon

नगर : ‘‘विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर (Nashik Election) मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांना (Politics Party) उमेदवारांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या तत्काळ प्राप्त करून घेण्यासाठी तालुकास्तरावर तहसील कार्यालयात ‘एक खिडकी सुविधा’ कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

या बाबतचे आदेश सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहेत,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosle) यांनी दिली.

नाशिक पदवीधर निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्यासाठी खासगी जागेवर जाहिरात फलक लावण्याची परवानगी, चौकसभा, प्रचार वाहन परवानगी प्रचार कार्यालय परवानगी, मिरवणुका, रोड शो, रॅली, ध्वनिक्षेपकाची परवानगी संबंधित कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांकडे, मतदानाच्या दिवशी उमेदवाराच्या निवडणूक बूथची परवानगी तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे दिली जाईल.

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हे विविध परवाने या ‘एक खिडकी सुविधा’ कक्षाच्या माध्यमातून तहसील कार्यालयातून दिले जातील.

तालुकास्तरावर नागरी भागासाठी मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी तहसीलदार यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

उमेदवार किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना या कामी नेमलेल्या सक्षम अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आवश्यक त्या परवानग्या तत्काळ देण्यात येतील.

Graduate Election
Nashik MLC Election : ‘नाशिक पदवीधर’साठी नगर जिल्ह्यात जास्त मतदार

नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतींचे ना-हरकत प्रमाणपत्र त्याच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातील एक जबाबदार अधिकारी नियुक्ती करून ना-हरकत प्रमाणपत्र उमेदवारांना तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com