कृषी विद्यापीठाकडून कांदा बियाणे विक्री सुरू

ऑनलाइन विक्रीसाठी ७,२०० किलो बियाणे उपलब्ध
Onion
OnionAgrowon

नाशिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून विकसित खरीप हंगामातील (Kharif Season) कांद्याचे ‘फुले समर्थ’ आणि ‘बसवंत-७८०’ या वाणांना शेतकऱ्यांकडून मागणी असते. विद्यापीठाने या वाणांचे बीजोत्पादन (Seed Production) घेऊन ‘फुले ॲग्रोमार्ट’ पोर्टलद्वारे कांदा बियाण्याची (Onion Seed) ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. नोंदणी करून पैशाचा भरणा केलेल्या शेतकऱ्यांसाठी बुधवार (ता.२२) पासून पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्रात कांदा बियाण्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यातून जवळपास २ हजार किलो बियाण्याची नोंदणी झाली आहे. (ता.२३) अखेर पोर्टलवर ७,२०० किलो कांदा बियाणे विक्रीसाठी ऑनलाइन उपलब्ध आहे. बियाणे संपेपर्यंत विक्री सुरू राहील, असे केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

विद्यापीठाच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कांद्याचे बियाण्याचे वाटप केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रा. राजेंद्र बिराडे यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. या प्रसंगी डॉ. राकेश सोनवणे, कमलाकर जाधव, मयूर भोकरे, अभिजित कोहकडे आणि किरण जाधव हे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व बियाणे विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांच्या सहकार्याने कामकाज सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com