Aaple Sarkar Seva Center : ‘आपले सरकार सेवा’ केंद्रासाठी ऑनलाइन सोडत

‘आपले सरकार सेवा’ केंद्रातील रिक्त जागा भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे ऑनलाइन सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Aaple Sarkar Sewa
Aaple Sarkar SewaAgrowon

पुणे ः पुणे जिल्ह्यातील ग्रामीण, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका,(Pune, Pimpri-Chinchwad Manpa) नगरपालिका व कटक मंडळ या ठिकाणी असलेल्या ‘आपले सरकार सेवा’ केंद्रातील रिक्त जागा (Aaple Sarkar Sewa) भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे ऑनलाइन सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Aaple Sarkar Sewa
ZP School: खेड्यांतल्या पोरांच्या शिक्षणाचं काय होणार?

आपले सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रक्रियेमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. एकूण २ हजार ८०२ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत. मुदतप्राप्त सर्व ऑनलाइन अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण होऊन पात्र अर्जासाठी ऑनलाइन पद्धतीने सोडत आयोजित केली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता, सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड सर्व व नगरपालिकांसाठी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता, पुणे महानगरपालिका १९ ऑक्टोबर सकाळी १० आणि ग्रामीण सर्व तालुक्यांसाठी २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सोडत काढण्यात येईल. सर्व सोडत कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, बी विंग येथील चौथ्या मजल्यावर होईल.

पात्र अर्जदारांची यादी https://aaplesarkarpune.com व https://pune.gov.in या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. संबंधित अर्जदारांनी त्यांच्या क्षेत्रानुसार नमूद केलेल्या दिवशी वेळेवर ऑनलाइन सोडतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com