Crop Loan : औरंगाबाद जिल्ह्यात केवळ १० टक्के कर्जपुरवठा

कोणत्याही हंगामात कर्जपुरवठा करताना हंगामापूर्वी व वेळेत कर्जपुरवठा होणे अपेक्षित आहे. परंतु दरवर्षी येरे माझ्या मागल्या प्रमाणे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात प्रत्येक हंगामात बँकांचा हात आखडताच असतो.
Crop Loan
Crop LoanAgriculture

औरंगाबाद : जिल्ह्यातील सहकारी, व्यापारी व ग्रामीण बँकेच्या माध्यमातून २५ नोव्हेंबर अखेरपर्यंत केवळ ९४०० शेतकऱ्यांना ७९ कोटी २ लाख रुपये कर्जपुरवठा (Loan Supply) करण्यात आला आहे. केवळ १०.६० टक्के झालेली कर्जपुरवठ्याची (Crop Loan) ही गती अत्यंत संथ असल्याची स्थिती आहे.

Crop Loan
Crop Loan : सांगली जिल्हा बॅंकेकडून ३४६ कोटींचे कर्ज मंजूर

कोणत्याही हंगामात कर्जपुरवठा करताना हंगामापूर्वी व वेळेत कर्जपुरवठा होणे अपेक्षित आहे. परंतु दरवर्षी येरे माझ्या मागल्या प्रमाणे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात प्रत्येक हंगामात बँकांचा हात आखडताच असतो. तीच स्थिती यंदा खरीपानंतर रब्बी हंगामा बाबतीत दिसते आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी, व्यापारी व ग्रामीण बँकांना मिळून १३५४ कोटी ५९ लाख १७ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Crop Loan
Rabi Crop Loan : रब्बीसाठी १४४ कोटींवर पीककर्ज वितरित

त्यापैकी ९८.१४ टक्के उद्दिष्ट पूर्ती करताना सर्व बँकांनी मिळून १ लाख ९० हजार ९६६ शेतकऱ्यांना १३२९ कोटी ३९ लाख रुपये कर्जपुरवठा केला होता. त्यामध्ये ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दिष्टाच्या पुढे जाऊन कर्जपुरवठा केला तर व्यापारी बँकांनी मात्र उद्दिष्टाचा केवळ ८५ टक्केच कर्जपुरवठा करून हात आखडता घेतला होता. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदाच्या खरीप हंगामासाठी ३०७ कोटी २६ लाख ५४ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

व्यापारी बँकांनी १८.९७ टक्के उद्दिष्ट पूर्ती पूर्ण करत ८ हजार ७४ शेतकऱ्यांना ६८ कोटी २१ लाख रुपये कर्जपुरवठा केला. व्यापारी बँकांना ३५९ कोटी ४९ लाख ६९ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ग्रामीण बँकेने १००४ शेतकऱ्यांना ९ कोटी ८८ लाख रुपये कर्ज पुरवठा करत १२.५७ टक्के उद्दिष्ट पूर्ती केल्याची माहिती सहकारी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कर्जपुरवठा स्थिती अशी...

रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांना मिळून ७४५ कोटी ४० लाख ८३ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २५ नोव्हेंबरअखेर सर्व बँकांनी मिळून ९ हजार ४०० सभासद शेतकऱ्यांना ७९ कोटी २ लाख रुपये कर्जपुरवठा करत केवळ १०.६० टक्के उद्दिष्टपूर्ती केली. त्यामध्ये सर्वांत कमी ०.३० टक्का उद्दिष्टपूर्ती करत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३२२ शेतकऱ्यांना ९२ लाख रुपयांचा कर्जपुरवठा केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com