उत्तर प्रदेशात सरासरीच्या केवळ ४० ते ६० टक्के पाऊस

मुख्यमंत्री आदित्यनाथ (Yogi Aaditynath) यांनी सांगितले की, १३ जुलैपर्यंत केवळ ७६.६ मिमी पाऊस पडला आहे, जो १९९.७ मिमीच्या सामान्य पातळीपेक्षा सुमारे ६२ टक्के कमी आहे.
Weather Updates
Weather UpdatesAgrowon

(वृत्तसंस्था)

अपुऱ्या मॉन्सूनचा (Monsoon) खरीप पिकांवर विपरित परिणाम होईल या चिंतेच्या पार्श्‍वभूमीवर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी (ता. १४) राज्यातील मॉन्सूनच्या स्थितीचा आढावा घेतला.

सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आदित्यनाथ (Yogi Aaditynath) यांनी सांगितले की, १३ जुलैपर्यंत केवळ ७६.६ मिमी पाऊस पडला आहे, जो १९९.७ मिमीच्या सामान्य पातळीपेक्षा सुमारे ६२ टक्के कमी आहे.

Weather Updates
Maize Production: जागतिक मका उत्पादन घटीचा अंदाज

असे १९ जिल्हे आहेत ज्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ४० ते ६० टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा आणि कृषी, पाटबंधारे, मदत आणि महसूल विभागांनी दक्ष राहावे.

प्रत्येक जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रे (KVK) , कृषी विद्यापीठे (Agriculture University) आणि कृषी शास्त्रज्ञ यांच्यामार्फत योग्य माहिती उपलब्ध होईल, याची खातरजमा करण्यासाठी विभागांना सातत्याने शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास सांगण्यात आले.

कमी पावसामुळे खरीप पिकांच्या (Kharip Crops) पेरणीवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. १३ जुलैच्या अद्ययावत स्थितीनुसार, खरीप अभियान २०२२-२३ अंतर्गत, ९६.०३ लाख हेक्टरच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ४२.४१ लाख हेक्टर जमिनीवर पेरणी झाली आहे, जी उद्दिष्टाच्या केवळ ४४.१६ टक्के आहे. यातील ४५ टक्के केवळ भातशेतीमुळे (Paddy) होते.

गेल्या वर्षी १३ जुलैपर्यंत ५३.४६ लाख हेक्टर जमिनीवर पेरण्या (Kharip Sowing) झाल्या होत्या. मॉन्सूनला उशीर होत असताना राज्यातील सर्व प्रमुख नद्या, कालवे आणि जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा (Water Storage) आहे, ही समाधानाची बाब असल्याचेही आदित्यनाथ म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com