गोकुळचे शेतकरीच अमूलचं आव्हान परतवतीलः मुश्रीफ

नवीन दोन म्हशी घेत आमदार मुश्रीफांनी दूधउत्पादन वाढीची स्वतःपासूनच केली सुरुवात.
Hasan Mushrif
Hasan MushrifAgrowon

कागल, जि. कोल्हापूरः गोकुळ दूध संघ (Gokul Milk) हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची वरदायिनी आहे. या संघासमोर असलेले अमूल दूधाचे आव्हान (Challenge Of Amul Milk) गोकुळ दूध संघाचे दूध उत्पादक शेतकरीच परतवून लावतील, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केला.

आमदार हसन मुश्रीफ यांनी संघाच्या संचालक व कर्मचाऱ्यांना दूध उत्पादन वाढीसाठी नवीन म्हशी घेण्याचे व त्याची सुरुवात स्वतःपासूनच करण्याचे आवाहन केले होते. मुश्रीफ यांनी स्वतःच नवीन दोन म्हशी घेत या उपक्रमाची सुरुवात केली. आता आधीच्या आठ आणि नवीन दोन अशा दहा म्हशी मुश्रीफांच्या गोठ्यात आहेत.

Hasan Mushrif
भेसळ रोखण्यासाठी गोकूळ पॅकिंग बदलणार

आमदार मुश्रीफ म्हणाले, की गोकुळ दूध संघाची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या ताब्यात येऊन एक वर्ष झालं. संघाने एक वर्षात केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा आम्ही यापूर्वीच मांडलेला आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये २० लाख लिटर म्हशीच्या दुधाचे मार्केट उपलब्ध असल्याची आमची आत्ता खात्री झालेली आहे. अशातच अमूल दूध संघासारखे फार मोठे आव्हान गोकुळ दूध संघासमोर उभे आहे. त्यामुळेच म्हशीचे दूध वाढविण्यामध्ये जर यशस्वी झालो, तर गोकुळ दुधाचा ब्रँड हा अमूलपेक्षाही मोठा होईल.

Hasan Mushrif
Organic Amul: अमूलच्या सेंद्रिय गव्हाच्या पिठाचे प्रमाणीकरण

अमूल दूध संघाने नाशिकमध्ये नुकतीच ८५० एकर जमीन घेतलेली आहे. तिथे ते म्हशीचा प्रकल्प उभारणार आहेत. तिथे उत्पादित म्हशीचे दूध मुंबई बाजारात आणून गोकुळचे मार्केट ताब्यात घेण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. अमूलसारखा एवढा मोठा प्रकल्प तर आम्ही उभा राहू शकत नाही. परंतु; त्यांना उत्तर द्यायचे असेल तर म्हशीच्या दूधाच उत्पादन वाढावे लागेल.

गोकुळच्या दूध उत्पादकांची संख्या पाच लाखावर आहे. त्यापैकी सव्वा लाख शेतकऱ्यांनी फक्त एक-एक म्हैस जरी घेतली तरी अमूलचे आव्हान परतवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. आठवड्यापूर्वीच संचालक मंडळाच्या उपस्थितीत आम्ही दूधवाढीसाठी कार्यशाळा घेतली. त्यामध्ये आम्ही संकल्प सोडला की नेत्यांनी व संचालकानी प्रत्येकी दोन म्हशी घेतल्या पाहिजेत, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी एक म्हैस घेतलीच पाहिजे. शेतकऱ्यांनाही एक म्हैस घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. केडीसीसी बँक त्यासाठी लागेल ते अर्थसहाय्य करील. गोकुळ दूध संघही त्यासाठी जास्तीत जास्त अनुदान देईल.

पुढच्या टप्प्यात ५० टक्के शेतकऱ्यांपर्यंत आपण ही मोहीम राबविली तर निश्चितच नव्याने दहा लाख लिटर दूध उत्पादन वाढेल. गेल्या वर्षापासून आम्ही सत्तेवर आल्यानंतर म्हशीच्या दुधाला सहा रुपये आणि गाईच्या दुधाला पाच रुपये दरवाढ दिली. या वेळेला चांगला दूध दरफरक देण्याचा मानस अध्यक्ष आणि संचालक मंडळांने केला आहे. या दूध उत्पादन वाढीच्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहकार्य करा. गोकुळ हा देशातील एक नंबर ब्रँड होण्यासाठी हातभार लावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com