
Maharashtra Budget Session 2023 : गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटीमुळे (Hailsorm) शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले आहे. या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत (Compensation) करण्याची गरज आहे. याच मागणीसाठी विरोधीपक्षाच्या आमदारांनी आजही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसरा आठवड्याच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस आणि गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात सरकारने ठोस भूमिका घेण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास अस्मानीच्या संकटाने हिरावल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कालही विरोधकांनी सरकारला धारेवर धरत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले होते.
विरोधीपक्षाच्या आमदार आणि प्रमुख नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याशिवाय महाविकास आघाडी सरकराच्या काळातील विकासकामांवरील स्थिगिती उठवण्यासाठीही घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.