Inflation : महागाईच्या विरोधात विरोधकांची निदर्शने

काँग्रेसने अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात मोदी सरकारची महागाईच्या मुद्द्यावरून कोंडी करण्याचे रणनीती आखली आहे.
Inflation
InflationAgrowon

नवी दिल्ली : काँग्रेसने अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात मोदी सरकारची (Modi Government) महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून कोंडी करण्याचे रणनीती आखली आहे त्यानुसार सोमवारी दोन्ही सभागृहांमध्ये महागाईचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंगळवारी संसद भवनाच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने (Protest Against Inflation) करण्यात आली.

Inflation
Inflation In Food महागाई रोखण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांचं योगदान | ॲग्रोवन | Agrowon

या निदर्शनांमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही सभागृहांमधील खासदार सहभागी झाले होते. याबरोबरच शिवसेना व डाव्या पक्षांच्या खासदारांनी ही यात भाग घेतला. इंधन दरवाढ, एलपीजीचे कडाडलेले दर, अन्नधान्याच्या महागड्या किमती याला केंद्र सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदारांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यासंदर्भात राहुल यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून सरकारवर जोरदार तोफ डागली. अबकी बार, वसुली सरकार अशा शब्दांत त्यांनी शरसंधान केले.

Inflation
महागाई, युद्धामुळे काजूची जागतिक मागणी मंदावणार

राहुल यांनी म्हटले की आता दूध, दही, लोणी, तांदूळ, डाळी, ब्रेड यांसारख्या पॅकबंद वस्तूंवर जनतेकडून पाच टक्के जीएसटी वसूल केला जाणार आहे. दैनंदिन आहारातील गोष्टी महाग झाल्या आहेत. सिलिंडरची किंमत हजार रुपयांच्या वर गेली आहे, पण सरकार तर सारे काही छान चालले आहे असेच म्हणते आहे. याचा अर्थ महागाई ही सरकारची नव्हे तर जनतेची समस्या आहे. पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षात असताना महागाई हा सर्वांत मोठा मुद्दा बनवला होता, पण आज त्यांनी जनतेला अडचणींच्या खोल दलदलीत ढकलले आहे.

महागाईमुळे जनता हतबल झाली असताना पंतप्रधान मोदी मौनात आणि आनंदात आहेत. ते अधिकाधिक खोटे बोलत आहेत. अनेक शब्दांना असंसदीय ठरवून पंतप्रधानांनी विरोधकांना गप्प करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांना उत्तर द्यावेच लागेल.
राहुल गांधी, काँग्रेस नेते

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com