मुंबईसह कोकणात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

विदर्भातील भंडारा, अमरावती, नागपूर जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी पडल्या, तर मध्य महाराष्ट्रात पावसाची दडी कायम होती.
मुंबईसह कोकणात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’
Heavy Rain agrowon

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणसह घाटमाथ्यावर पावसाला सुरूवात झाली आहे. कोकणात पावसाचा जोर वाढू लागल्याने आज (ता. २०) मुंबई, कोकणात जोरदार पावसाचा (Heavy Rain) ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सून संपूर्ण राज्य व्यापले असून, कोकण, विदर्भासह राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान झाले आहे. कोकणच्या विविध भागात शनिवारपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. रविवारी (ता.१९) सकाळपासून मुंबई, उपनगरांसह कोकणात पावसाची संततधार सुरू होती. रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदूर्गमधील मालवण येथे सर्वाधिक १०५ मिलिमीटर, तर वेंगुर्ला येथे ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भातील भंडारा, अमरावती, नागपूर जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी पडल्या, तर मध्य महाराष्ट्रात पावसाची दडी कायम होती.

हरियाना आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पूर्व भारतात, तर अरबी समुद्रातून मॉन्सूनचे प्रवाह वाढल्याने किनारपट्टीय भागात ढगांची दाटी झाली आहे. कोकणात आजपासून (ता. २०) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमान कमी होत आहे. रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा येथे तापमानाचा पारा ३८ अंशांवर असून उर्वरित राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे.

रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्याच्या विविध भागात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ( स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : अलिबाग ३९, तळा ४०, हर्णे ३६, रत्नागिरी ४०, दोडामार्ग ३८, कुडाळ ३९, मालवण १०५, सावंतवाडी ४३, वेंगुर्ला ६१.

मराठवाडा : सोयगाव ४०, अंबेजोगाई १८, परळी वेजनाथ १९, भोकरदन १८, देगलूर ४५, उस्मानाबाद १२, सेलू ३७.

विदर्भ : अमरावती ३१, चांदूरबाजार ४८, चिखलदरा ३८, मोर्शी ३६, तिवसा ५२, मोहाडी ३७, पवनी ३२, साकोली ५२, सडक अर्जूनी ३३, कळमेश्वर ३५, काटोल ३६, नरखेडा ४३, पारशीवणी ३०.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

मध्य महाराष्ट्र : सातारा, कोल्हापूर,

विदर्भ : यवतमाळ, चंद्रपूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com