Weather Update : पुणे, साताऱ्यात आज ‘ऑरेंज अलर्ट’

आज (ता. १४) पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर (Rain Intensity) कायम आहे. मराठवाडा, विदर्भासह राज्यात पावसाचा जोर कमी (Rainfall) अधिक होत आहे. आज (ता. १४) पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert Of Heavy Rain) देण्यात आला आहे. तर दक्षिण कोकण, विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast Along With Lightning) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Update
Soybean Rate : सोयाबीनला यंदाही चांगला दर मिळणार

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्रापासून ईशान्य बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे. दक्षिण गुजरातपासून ते केरळ पर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येणार आहे. त्यामुळे दोन दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली असून कोकण, घाटमाथ्यावर माथ्यावर पावसाची जोर मात्र टिकून आहे. आज (ता. १४) पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे. तर पूर्व मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.

Weather Update
Agriculture Technology : नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या निधीत गैरव्यवहाराचा संशय

कमी दाब क्षेत्र होणार तीव्र

उत्तर बंगालच्या उपसागर आणि परिसरावर शनिवारी (ता. १३) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र ठळक होईल. आज या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार होण्याचे संकेत आहेत. तर अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निवळत आहे. ही प्रणाली पुन्हा ईशान्येकडे फिरण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पुणे, सातारा

.........

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर.

.......

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

घाटमाथ्यावर जोर, राज्यात श्रावणसरी

कोकणासह राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कमी अधिक आहे. ऊन सावल्यांच्या खेळात श्रावणसरी येत आहेत. घाटमाथ्यावर मात्र जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये साताऱ्यातील शिरगाव आणि पुणे-रायगडच्या घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे सर्वाधिक २१० मिलिमीटर पाऊस झाला. तर घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणांसह, महाबळेश्वर, इगतपुरी, गगनबावडा, वेल्हे येथे १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला. पाणलोटातून पाण्याचा पुरवठा होत असल्याने प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

राज्यात शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : तळा ८०, लांजा ७०, दापोली ६०, मंडणगड, मोखेडा, चिपळूण, शहापूर, सुधागडपाली, संगमेश्वर, कर्जत, अंबरनाथ प्रत्येकी ५०, माथेरान, महाड, सावंतवाडी, पोलादपूर, कल्याण, पेण, म्हसळा, मुरबाड प्रत्येकी ४०.

...

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर १६०, इगतपुरी ११०, गगनबावडा, वेल्हे प्रत्येकी १००, लोणावळा ९०, राधानगरी ८०, शाहूवाडी, जावळीमेढा प्रत्येकी ६०, चंदगड ५०, गारगोटी, पन्हाळा प्रत्येकी ४०, आजरा, सुरगाणा, पौड प्रत्येकी ३०

...

घाटमाथा : शिरगाव, ताम्हिणी प्रत्येकी २१०, दावडी १८०, डुंगरवाडी, अंबोणे प्रत्येकी १४०, कोयना नवजा १३०, कोयना पोफळी १००, भिरा १३०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com