Orange Crop Damage अमरावती ः फळगळतीमुळे (Orange Fruit Fall) ५०० कोटींपेक्षा अधिक नुकसान (Crop Damage) सोसलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा (Natural Calamity) सामना करावा लागला. यावेळी वादळी वाऱ्यामुळे फळगळती होत नुकसान झाले. त्याची दखल घेत मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्यात सर्वाधिक संत्रा लागवड क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. गेल्या हंगामात बुरशीजन्य रोगांमुळे संत्र्यांची मोठी गळ झाली.
या गळतीमुळे सुमारे ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज महाऑरेंजकडून वर्तविण्यात आला होता. आता मोर्शी तालुक्यात बुधवारी (ता. १) पासून वादळी वारे वाहत आहेत.
त्याचा फटका पुन्हा एकदा संत्रा उत्पादकांना बसला आहे. लहान आकाराची फळे वाऱ्याचा मार सहन करू शकत नसल्याने त्यांची गळ होत आहे.
चक्रीवादळामुळे पाळा, सालबर्डी, भिवकुंडी, धानोरा, तरोडा, मलिमपूर, चिखलसावंगी, चिंचोली गवळी, दापोरी, डोंगरयावली, मायवाडी, घोडदेव या गावातील संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांची दखल घेत संत्रा पिकाचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी ‘प्रहार’चे उपतालुका प्रमुख नरेंद्र सोनागोते यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.