Snail : गोगलगायग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शंखी गोगलगायीमुळे अंदाजे पावणे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
Snail Attack
Snail AttackAgrowon

पुणे ः शंखी गोगलगायीमुळे (Snail Attack On Crop) खरीप पिकांचे नुकसान (Kharif Crop Damage) झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तातडीने पंचनामे (Survey's Of Crop Damage) करावेत, असे आदेश कृषी विभागाने (Department Of Agriculture) राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

Snail Attack
Snail: शंखी गोगलगाईचा पिकांवर प्रादुर्भाव

कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शंखी गोगलगायीमुळे अंदाजे पावणे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र इतर जिल्ह्यांत देखील पीकहानी असण्याची शक्यता आहे. यापूर्वी गोगलगायीमुळे पीकहानी झाल्यानंतर कधीही स्वतंत्रपणे मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या नोंदी घेताना गोगलगायीच्या विषयाकडे महसूल विभागाने फारसे लक्ष दिलेले नव्हते.

Snail Attack
snails: गोगलगायींचे हवे एकात्मिक अन् सामूहिक नियंत्रण

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीमाल हानीचा आढावा घेताना लोकप्रतिनिधींनी गोगलगायींचाही मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना गोगलगायीने हानी केलेल्या क्षेत्रालाही मदत देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याची स्वतंत्र आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळेच कृषी मंत्रालयाने सर्व महसूल आयुक्तांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्याची कामे पूर्ण होताच नैसर्गिक आपत्तीमधील ‘कीड प्रादुर्भाव’ या मुद्द्याखाली असलेल्या तरतुदीत शंखी गोगलगायीचे नुकसान गृहीत धरले जाईल व शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी वाटपाच्या मार्गदर्शक सूचनेत ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असलेल्या पिकांसाठीच मदत द्यावी, असा दंडक केंद्र शासनाने घालून दिलेला आहे. त्यामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असलेल्या क्षेत्राचे पंचनामे झाल्यानंतर तशी यादी व निधी मागणीचे प्रस्ताव राज्य शासनाला पाठवावे लागतील. ती जबाबदारी महसूल आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. आयुक्तांनी त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे ही कामे सोपविली आहेत. सध्या जिल्हाधिकारी ते तहसील कार्यालयांच्या स्तरावर या कामांची लगबग सुरू आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचे आतापर्यंत झालेले नुकसान १८ लाख हेक्टरपेक्षा जास्त नोंदविले गेले आहे. त्यात गोगलगायग्रस्त क्षेत्राची भर पडू शकते. दरम्यान, आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना आता कमाल दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळेल. एक हेक्टरसाठी वाढीव मदत मिळणार आहे. त्यामुळे आधीच्या याद्यांचा पुन्हा आढावा घेतला जात आहे. अतिरिक्त क्षेत्रानुसार निधीची वाढीव मागणी शासनाला केली जाणार आहे. त्यामुळे मदतीच्या अंतिम याद्या तयार होणे व त्यानुसार निधी वाटपाचे काम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. ही कामे महिनाभर चालू शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

शंखी गोगलगायीमुळे अंदाजे पावणेदोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान

‘कीड प्रादुर्भाव’ खाली नुकसान गृहीत धरणार

३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचेच पंचनामे ग्राह्य धरणार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com