Crop Loan : शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटपासाठी बँकांना आदेश द्या

बळीराजा फाउंडेशनची सहकारमंत्री अतुल सावेंकडे मागणी
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

भोकरदन, जि. जालना : बँकांना शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटप (Crop Loan) करण्याचे आदेश देण्याची मागणी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे (Narayan Lokhande) यांनी सहकारमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्याकडे केली आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin Vaccination : सातारा जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण ९८ टक्के

बळीराजा फाउंडेशनच्या मागणीनुसार तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक तसेच अन्य राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास विलंब करीत आहेत. खरीप हंगाम संपला तरी ही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : सात जिल्ह्यात शंभर जनावरांचा मृत्यू

सावकरी कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी पीककर्ज मिळण्यासाठी मे महिन्यात ऑनलाइन अर्ज करून सर्व माहिती भरलेली होती;

मात्र चार महिने उलटूनही शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. शेतकरी बँकामध्ये चकरा मारून थकलेले आहे. त्यामुळे तातडीने पीककर्ज वाटप करण्याची मागणी नारायण लोखंडे यांनी सहकारमंत्री अतुल सावे यांची औरंगाबाद येथे भेट घेऊन शेतकऱ्यांची कैफियत मांडत केली आहे. यावेळी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंभीरपणे उभे आहे. राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचे आदेश देणार असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितल्याचे श्री. लोखंडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com