Pune APMC : डमी अडत्यांची ‘कुंडली’ सादर करण्याचे आदेश

पुणे बाजार समितीचे प्रशासन खडबडून जागे
Pune APMC
Pune APMCAgrowon

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (Pune APMC) बनावट अडत्यांकडून (Fake Adtiya) शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक व सेस चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी बाजार समिती प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यासाठी आता प्रत्येक गाळ्यावर ‘डमी’ म्हणून कार्यरत अडत्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला आणि दोन छायाचित्रे सादर करण्याचे आदेश गाळा मालकाला दिले आहेत.

Pune APMC
Pune Rain : पुणे जिल्ह्यात हलक्या सरी

बाजारातील डमी अडत्यांकडून शेतीमालाची नोंद आणि हिशेबपट्टी न करता, परस्पर चिठ्ठीवर शेतीमालाची खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर डमी अडत्यांसह बाजारात काम करणाऱ्या इतर घटकांची माहिती बाजार समितीकडे नसल्याचे निष्पन्न झाले. हा सगळा प्रकार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोपदेखील काही अडत्यांनी केला. यानंतर झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने डमी अडत्यांची माहिती संकलन करण्याचा आदेश काढला आहे.

Pune APMC
Pune APMC ; डमी अडत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

धमकावल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी

बनावट अडते आणि व्यापाऱ्यांकडून चिठ्ठीच्या व्यवहारातून शेतकऱ्यांच्या फसवणकीबरोबरच बाजार समितीचा सेसदेखील बुडविला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

यामध्ये पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचा आणि धमकाविल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे केल्या आहेत. अशा घटनांमध्ये काही डमी हे परप्रांतीय आहेत. हे लक्षात घेऊन बाजार समितीने सुरक्षिततेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले आहे. लवकरात लवकर माहिती जमा करण्यास गाळेधारकांना सांगितले आहे.

गाळेधारकानेच डमी अडत्याला भाडे घेऊन व्यापार करण्यास परवानगी दिलेली असते. त्यामुळे गाळेधारकांनाच फसवणुकीचे पैसे भरावे लागतील. बाजारातील डमी अडत्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचे पैसे बुडविल्यास अथवा सेस चुकविल्याचे निष्पन्न झाल्यास ते भरण्याची जबाबदारी गाळेधारकांचीच आहे.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com