Organic Farming : ‘पंदेकृवि’मध्ये सेंद्रिय उत्पादक शेतकरी-शास्त्रज्ञांचा मंच

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, कृषी विद्या विभागाच्या वतीने शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना करण्यात आली.
Organic Farming
Organic FarmingAgrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, कृषी विद्या विभागाच्या वतीने शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना करण्यात आली. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हातात घेण्यात आला आहे.

या मंचाची पहिली बैठक येथे घेण्यात आली. यावेळी दिग्रस, चांदूर, नागी, शहापूर, वनोजा आणि वाडेगाव या सहा गावांतील निवडक २३ शेतकरी उपस्थित होते.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्या विभाग प्रमुख तथा प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. एन. पसलावार होते. त्यांनी शेतकऱ्यांना या संकल्पनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांनुमते मंचाच्या सहा सदस्यीय कार्यकारिणीचे देखील गठण करण्यात आले.

कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी गेल्या पंधरा वर्षांपासून सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करून ऊर्जितावस्था प्राप्त केलेले शेतकरी राजेंद्र महादेव ताले (रा.दिग्रस) यांची एकमताने निवड करण्यात आली.

Organic Farming
Pm Kisan : शेतकरी सन्मान योजनेचे ६०७७ लाभार्थी राहणार वंचित

मंचाची कार्यपद्धती ठरविण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी निवड केलेल्या गावांना विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांद्वारे प्रत्यक्ष भेटीची नियोजनबद्ध रूपरेषाही निश्चित करण्यात आली.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसाठी वरिष्ठ संशोधन सहायक तथा समन्वयक डॉ. परीक्षित शिंगरूप यांनी सेंद्रिय शेती प्रक्षेत्र भेटीचे नियोजन केले. शेतकऱ्यांसोबत प्रक्षेत्रावरील पिके आणि पीक पद्धतीविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक सहायक प्राध्यापक तथा मंचाचे समन्वयक डॉ. नितीन राऊत यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com