
Organic Agriculture : शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून प्रगती साधण्याची गरज आहे. मात्र, आगामी काळात सेंद्रिय शेती व गो संवर्धन (Cow Rearing) केले तरच विषमुक्त अन्न मिळेल, असे मत भारतीय गोसंवर्धन एफपीओ फेडरेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र शेगोकार यांनी व्यक्त केले. शुक्रवारी (ता. २८) येथे आयोजित शेती उत्पादक कंपन्यांच्या फेडरेशनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी फेडरेशचे संस्थापक चेअरमन निरंजन कुळकर्णी, जनरल सेक्रेटरी पंकज देशमुख, विदर्भ गोरक्षा प्रमुख श्री.बिडवई, पुणे येथील प्रशांत चासकर यांची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील व देशातील सर्व फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसोबत गो संवर्धनासाठी शेगाव येथे मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
संवर्धनासाठी सुक्या चाऱ्याचे पॅलेट, हिरव्या चाऱ्याचा सायलेस याचा एकत्रित कारखाना करून शेतकऱ्यांना व दूध व्यवसायिकांना सातत्याने वर्षभर चारा पुरवण्यासाठी फेडरेशन सोबत महाराष्ट्रभरामधून २८ कंपन्या सहभागी झाल्या.
या सर्व कंपन्यांच्या माध्यमातून, उत्पादन करून पॅकिंग करणे, दूध व्यवसायिकांना पुरवणे हा सर्व उपक्रम केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे.
देशी गोपालन, देशी कोंबडी, देशी मत्सालय, देशी मधमाशा, देशी बकरी पालन या व्यवसायातून एकरी सव्वातीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्याचे जीवनमान उंचावल्या जाऊ शकते असे मत तज्ज्ञांनी मांडले.
कार्यक्रमाला व्यवस्थापक बाळासाहेब विरघट, नगरसेविका प्रीती शेगोकार, जयाताई देशमुख, संदीप खंडारे, विजय भालतडक, प्रभाकर पहुरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.