Sugarcane Factory
Sugarcane Factory Agrowon

Sugarcane Factory : साखर कारखान्यांविरोधात संघटना आक्रमक

मोदी, फडणवीस शेतकरी विरोधी; रघुनाथ पाटील यांचा आरोप

नगर : नेवासा येथील तहसील कार्यालयात शेवगाव, नेवासा तालुक्यांतील साखर कारखान्यांच्या (Sugarcane Factory) भूमिकेविषयी चर्चा करण्यासाठी बैठक झाली. त्यात साखर कारखान्यांबाबत संघटना तसेच कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच शेतकरी विरोधी भूमिकेत राहिले आहेत,’’ असा आरोप या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.

नेवासे तहसील कार्यालयात ज्ञानेश्वर, मुळा व गंगामाई साखर कारखान्यांच्या मनमानी विरोधात शेतकरी संघटना तसेच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मागील वर्षी गुजरात राज्यात उसाला ४ हजार ७०० रुपये, तर उत्तर प्रदेशात साडेतीन हजारापेक्षा जास्त भाव दिला गेला. मात्र महाराष्ट्रात २९०० रुपये एफआरपी होती. टनामागे ‘आरएसएफ’चा फरक ६०० रुपये कसा राहतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उसाच्या भावासाठी लढाई बंद करून शेतकऱ्यांच्या बाजूने एकही कायदा राहिला नाही. या विरुद्ध लढा आवश्यक झाला असल्याचे रघुनाथदादा म्हणाले.

Sugarcane Factory
Crop damage : शिरोळ तालुक्यात पंचनामे पूर्ण

कारखान्यांच्या ऊस वजनकाट्यात घोटाळा

अतिवृष्टीनंतर मदत देण्याच्या मागणीसाठी आम्ही दिवाळी सणाच्या दिवशी चटणी-भाकर खाण्याचे आंदोलन करूनही तालुक्यातील साखर कारखाने मूग गिळून गप्प बसले,’’ असा आरोप ''मनसे''च्या मीरा गुंजाळ यांनी केला. याशिवाय कारखान्यांच्या ऊस वजनकाट्यात घोटाळा असल्याचा आरोप करून एफआरपीचा भाव लवकर जाहीर करण्याची सूचना करण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com