कृषिकन्यांद्वारे औषधी वनस्पती, रानभाजी प्रदर्शनाचे आयोजन

प्रदर्शनाचे आयोजन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील कृषिकन्यांमार्फत करण्यात आले.
Organizing an exhibition of medicinal plants, wild vegetables by agriculture Students
Organizing an exhibition of medicinal plants, wild vegetables by agriculture StudentsAgrowon

ओणनवसे (ता.दापोली) ः येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात औषधी वनस्पती आणि रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये दिंडा, करटोली, मायाळू, चूच, तेरी, फोडशी, करंदा, गुळवेल इ. दुर्मिळ रानभाज्या आणि औषधी वनस्पती ठेवण्यात आल्या.
प्रदर्शनाचे आयोजन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील कृषिकन्यांमार्फत करण्यात आले. यावेळी कृषिकन्यांनी दैनंदिन आहारात औषधी वनस्पती आणि रानभाज्या सेवनाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले.

Organizing an exhibition of medicinal plants, wild vegetables by agriculture Students
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`

कृषिप्रणाली गटातील कृषिकन्या दानिया मुल्ला, युक्ता चव्हाण, अनामिका जागुष्टे, प्रथा नाईक, सुप्रिया नाईक, ऋतुजा खरात व श्रद्धा मुढेंकर यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले. यावेळी सरपंच राजेंद्र आदावडे, मुख्याध्यापक दीपक गायकवाड, मुकुंद दांडेकर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि बचतगट सदस्य उपस्थित होते. या उपक्रमासाठी राजेंद्र भिंगार्डे, आशिष शिगवण यांचे मार्गदर्शन लाभले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com