Land Acquisition : उस्मानाबाद रेल्वेमुळे पर्यटनाला मिळणार चालना

सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद या रेल्वेमार्गासाठीच्या भूसंपादनाला आता गती आली आहे.
Railway
RailwayAgrowon

Land Acquisition सोलापूर : सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद या रेल्वेमार्गासाठीच्या (Solapur Railway) भूसंपादनाला (Land Acquisition) आता गती आली आहे. उद्योग, व्यवसायाबरोबर तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर यासारख्या तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाला (Tourism) यामुळे चालना मिळणार आहे.

कसबे सोलापूर वगळता इतर ठिकाणची मोजणी पूर्ण झाली आहे. कसबे सोलापूरचा प्रश्नही आठदिवसांत सोडवला जाणार असून कुणाचेही राहते घर बाधित होणार नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.

Railway
Railway : रेल्वे चौपदरीकरण काम संथगतीने

सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद हा रेल्वेमार्ग उत्तर सोलापूर तालुक्यातील ९ गावांतून जाणार असून, त्यासाठी ५ हजार ६७ शेतकऱ्यांच्या १८५.४२ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात येणार आहे.

सोलापूर - उस्मानाबाद या रेल्वेमार्गामुळे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र रेल्वे थेट जोडला जाणार आहे. यामुळे व्यापार, धार्मिक पर्यटनात वाढ होणार आहे.

पंढरपूर अक्कलकोट येथील भाविकांना तुळजापूरला जाणे सोयीचे होणार आहे. तर तुळजापूरला आलेल्या भाविकांना पंढरपूर अक्कलकोटला येता येणार आहे.

Railway
Railway : अमळनेर-चोपडा रेल्वेमार्गाची चाचपणी

या यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून, त्यावर भूसंपादन विभागाने हरकती मागविल्या आहेत. भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जवळपास १०७ हरकती दाखल झाल्या आहेत. या रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात जवळपास ११० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

ठळक बाबी

उत्तर सोलापूर तालुक्यातील नऊ गावांतील २१० शेतगट होणार बाधित जिल्ह्यातील ५ हजार ६७ शेतकऱ्यांच्या १८५.४२ हेक्टरचे होणार भूसंपादन तुळजापूर- पंढरपूर- अक्कलकोट येथील धार्मिक पर्यटनात होणार वाढ जिल्ह्यात खेड, मार्डी हे दोन नवे रेल्वे स्टेशन तयार होणार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com