अन्यथा १६ ऑगस्टपासून राज्यात कांदा विक्री बंद

राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात सरासरी २५ रुपये प्रति किलोचा दर द्यावा. अन्यथा, १६ ऑगस्टपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बेमुदत कांदा विक्री बंद करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला.
Onion
OnionAgrowon

नाशिक : कांद्याचा उत्पादन खर्च (Onion Production Cost) प्रतिकिलो २० ते २२ रुपये येत असताना त्यास सरासरी ८ ते १० रुपये इतका कमी दर (Onion Rate) मिळत आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात सरासरी २५ रुपये प्रति किलोचा दर (Onion Average Rate) द्यावा. अन्यथा, १६ ऑगस्टपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Producer Farmer) बेमुदत कांदा विक्री बंद करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला.

Onion
Onion : देशात कांदा लागवडीत घट

या बाबत संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले, ‘‘कांद्याला थोड्याफार दिवसांसाठी भाव वाढल्यावर तत्काळ एका दिवसात कांदा निर्यातबंदी, परदेशी कांद्याची आयात, कांदा व्यापाऱ्यांवर धाडी, कांदा साठ्यावर मर्यादा अशा विविध क्लृप्त्या वापरून कांद्याचे दर पाडण्याचे काम सरकारकडून केले जाते. मात्र आता शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. सरकारचे मात्र शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. लोकप्रतिनिधींनीही कांदा प्रश्नावर कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका न घेतल्याने उत्पादकांमध्ये संताप आहे.

Onion
GI For Onion : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला लाभला भौगौलिक निर्देशांक

राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेसह राज्यातील विविध शेतकरी संघटनांनीही गेल्या काही महिन्यांत रास्ता रोको, मोर्चे, आंदोलने, राज्य व केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून तसेच कांदा परिषदेच्या माध्यमातून घसरलेल्या कांदादराप्रश्‍नी आवाज उठवून पाठपुरावा केला आहे. परंतु तरीही कांद्याच्या दरात वाढ होण्यासाठी सरकारकडून कोणतेही पावले उचलली गेली नाहीत. एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत मातीमोल भाव मिळत असताना या वर्षी नाफेडकडून अडीच लाख टन कांदा खरेदी करण्यात आला; परंतु नाफेडनेही शेतकऱ्यांचा कांदा १० ते १२ रुपये प्रतिकिलोप्रमाणे खरेदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले.

देशात सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रातून कांद्याची शंभर टक्के विक्री बंद झाल्यास देशात कांदा टंचाई निर्माण होऊन सरकारवर दबाव तयार होईल. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त म्हणजे सरासरी २५ रुपये दर मिळावा म्हणून हे कांदा विक्री बंद आंदोलन केले जाईल.
भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com