Power Supply : अन्यथा कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करणार

नांदेड परिमंडळातील तीन लाख ६ हजार १०२ शेतकऱ्यांकडे एक हजार १६६ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे.
Power Supply
Power SupplyAgrowon

नांदेड : नांदेड परिमंडळातील तीन लाख ६ हजार १०२ शेतकऱ्यांकडे एक हजार १६६ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांनी महावितरणला सहकार्य करत वीजबिलांची थकबाकी भरावी, अन्यथा नाइलाजास्तव कृषिपंपाचा वीजपुरवठा (Power Supply) खंडित करू, असा इशारा महावितरणच्या वतीने देण्यात आला आहे.

नांदेड परिमंडळातील सर्वच परिसरात पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने रब्बी हंगामात विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेली वीज खरेदी, कृषी पंपाच्या रोहित्र दुरुस्तीसाठी लागणारे ऑइल खरेदी तसेच इतर आवश्यक दुरुस्तीसाठी कृषी पंपाच्या थकीत वीजबिलाची वसुली होणे गरजेचे झालेले आहे.

Power Supply
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून वीजबिलांच्या वसुलीतून प्राप्त झालेला ६६ टक्के आकस्मिक निधी हा प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जमा झालेला निधी त्या त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे.

नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेचे पायाभूत सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Power Supply
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

जिल्ह्याची थकबाकी स्थिती अशी...

नांदेड परिमंडळा अंतर्गत येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील भोकर विभागातील ५२ हजार ४९२ शेतकऱ्यांकडे १६१ कोटी ८१ लाख रुपये, देगलूर विभागातील ३० हजार ७७२ शेतकऱ्यांकडे १२० कोटी ३६ लाख रुपये, नांदेड ग्रामीण विभागातील ३७ हजार १५१ शेतकऱ्यांकडे १२८ कोटी ३५ लाख, तर नांदेड शहर विभागातील ११ हजार ३४० शेतकऱ्यांकडे ४२७ कोटी १० लाख रुपयांची थकबाकी आहे.

परभणी जिल्ह्यातील परभणी विभाग क्रमांक एक मधील ४० हजार १०७ शेतकऱ्यांकडे १४५ कोटी आठ लाख रुपये, परभणी विभाग क्रमांक दोन अंतर्गत येणाऱ्या ५७ हजार ६४० शेतकऱ्यांकडे २०२ कोटी २७ लाख रुपये थकीत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील ७६ हजार ६०० शेतकऱ्यांकडे ३०५ कोटी ६५ लाख रुपयांची कृषिपंपाची थकबाकी थकीत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com