Lumpy Skin : जिल्ह्यात पावणे चार हजार जनावरांना प्रादुर्भाव

२१८ जनावरांचा झाला मृत्यू; करमाळा, माढ्याला सर्वाधिक झळ
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूर (Solapur) जिल्ह्यात ४०८ गावातील सुमारे तीन हजार ७६७ जनावरांना लम्पी स्कीनची (Lumpy Skin) प्रादुर्भाव झाला असून, त्यापैकी एक हजार ३११ जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. उर्वरित जनावरांवर उपचार सुरु आहेत. परंतु, दुर्दैवाने आतापर्यंत २१८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक ७० जनावरे करमाळा तालुक्यातील आहेत.

Lumpy Skin Disease
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी

सोलापूर जिल्ह्यात एकूण सात लाख ४५ हजार ३२४ गाय आणि बैल आहेत. त्यापैकी सात लाख २५ हजार ७१२ जनावरांना लम्पी स्कीन प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तर लम्पी बाधित दोन हजार २३२ जनावरांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात १४० जनावरे अत्यवस्थ आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून लम्पीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : मृत जनावरांच्या मालकांना मदतीसाठीच्या अटी रद्द

लसीकरण मोहिमही राबवण्यात येत आहे. ९५८ ठिकाणी लम्पीचा संदर्भात जनजागृती शिबिरे घेण्यात आली आहेत. तर या आजाराच्या अटकावासाठी १७२ तज्ज्ञांचे वैद्यकीय पथक कार्यरत केले आहे. पण लम्पीची बाधा अद्यापही नियंत्रणात नाही. त्यातही माढा आणि करमाळा तालुक्याला त्याचा मोठा फटका बसला आहे. एकूण २१८ जनावरांच्या मृत्यूपैकी करमाळ्यातील सर्वाधिक ७० आणि माढ्यातील ६५ जनावरांचा समावेश

आहे.

Lumpy Skin Disease
अखेर पशुसंवर्धन विभागाला आली जाग

६२ प्रकरणात मदत

जिल्ह्यात मृत पावलेल्या २१८ जनावरांपैकी ६२ जनावरांच्या मृत्यूपोटी संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित जनावरांच्या मालकांचे प्रस्तावही विचाराधीन आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. लवकरच मदत देण्यात येईल, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आलं.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com