‘फ्लोरोसिस’चा उटी गावाला विळखा

तालुक्यातील सहा हजार लोकसंख्येच्या उटी गावातील जलस्रोत फ्लोराईडने दूषित झाल्यामुळे येथील शेकडो नागरिकांना ‘फ्लोरोसिस’चा आजार जडला आहे.
Polluted Water
Polluted WaterAgrowon

महागाव, जि. यवतमाळ : तालुक्यातील सहा हजार लोकसंख्येच्या उटी गावातील जलस्रोत फ्लोराईडने दूषित (Polluted water) झाल्यामुळे येथील शेकडो नागरिकांना ‘फ्लोरोसिस’चा आजार (Fluorosis Disease) जडला आहे. दंत, अस्थी व किडनीच्या आजारांनी येथील नागरिक बेजार आहेत. शासन नागरिकांच्या आरोग्याबाबत किती गंभीर आहे, हे उटी या गावाला भेट दिल्यानंतर कळते.

Polluted Water
नागपुरात ५९ गावांमधील पाणी दूषित

उटी येथील शेकडो नागरिकांना दात, हिरड्या, हाडांचे आजार आहेत. अनेक जण किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. उटी व शेजारील वरुणा तांड्यावर फ्लोरोसिसच्या आजाराने अक्षरशः थैमान घातले आहे.

Polluted Water
आंबेगावात ३१ जलस्रोतांतील पाणी दूषित

पिण्याच्या पाण्यात प्रतिलिटर एक ते दीड मिलिग्रॅम (पीपीएम) पेक्षा अधिक प्रमाणात फ्लोराईडचे प्रमाण आढळल्यास फ्लोरोसिस हा आजार होतो. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या आजाराची गंभीर दखल घेऊन प्राधान्यक्रमाने उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला दिले आहेत. आरोग्य विभागाने २० वर्षांपूर्वी उटी येथे फ्लोराईडयुक्त पाण्याचे परीक्षण केले होते.

गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र कृती आराखडा करून उपाययोजना कराव्यात. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा माजी सरपंच शेषराव खंदारे, माजी उपसरपंच नत्थुजी मोरे आणि माजी उपसरपंच दिगंबर मोरे यांनी दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com