flood in Africa : काँगोच्या पुरात १७६ मृत्यू, 100 हून अधिक लोक बेपत्ता

Congo flooding
Congo floodingagrowon

DRC Congo Flood : पूर्व काँगोच्या दक्षिण किवू प्रांतात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात १७६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, असे स्थानिक अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.

काॅंगोमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरामुळे हजारो लोक बेघर झाले असून १०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.

Congo flooding
Pakistan Flood : पाकिस्तानच्या ५७ लाख नागरिकांना अन्नटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता | ॲग्रोवन

प्रादेशिक सरकारी अधिकारी थॉमस बेकेंगे यांनी सांगितले की, कालेहेच्या बाधित प्रदेशात मोठे नुकसान झाले असून चिखलातून १०० पेक्षा जास्त लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. अनेक जण बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरू आहे. तसेच प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.

गुरुवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानंतर दोन नद्यांनी त्यांचे पात्र सोडले असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक भूस्खलन होऊन अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, गावातील 75 टक्क्यांहून अधिक घरे, शाळेच्या इमारती आणि आरोग्य केंद्रासह पुरात वाहून गेली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com