Heavy Rain : अडीच लाखांवर शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

अतिवृष्टीने जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान कोरडवाहू शेतीचे झाले. २ लाख ११ हजार ३४६ शेतकऱ्यांची तब्बल २ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके उद्‍ध्वस्त झाली.
Crop Damage
Crop DamageAgrowon

अमरावती : अतिवृष्टीने जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain) कोरडवाहू शेतीचे (Dry Land Agriculture) झाले. २ लाख ११ हजार ३४६ शेतकऱ्यांची तब्बल २ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके उद्‍ध्वस्त (Crop Damage) झाली. कोरडवाहू शेतकऱ्यांना वाढीव दराने मदतीची (Relief To Farmer) घोषणा झाली आहे. ६९५ हेक्टर बागायती व ३५ हजार ६८० हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान (Orchard Damage) झाले आहे. मात्र, या दोन्ही शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा अद्याप झालेली नसल्याने या शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करा

जुलै व ऑगस्टमध्ये दहा दिवस अतिवृष्टी झाली. जुलैतील पावसाने जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार हेक्टरला फटका बसला होता. तर ऑगस्टमधील अतिवृष्टीने हा आकडा वाढत जाऊन २ लाख ५८ हजार हेक्टरवर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान कोरडवाहू शेतीचे झाले असून, तब्बल २ लाख ४ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रातील पिके उद्‍ध्वस्त झाली आहेत. २ लाख ११ हजार ३४६ शेतकऱ्यांचे या हंगामातील पीक बुडाले आहे.

Crop Damage
Crop Damage : अमरावती जिल्ह्यातील ३१ टक्के क्षेत्रातील खरीप बुडाला

७ ते १० ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. वरुड तालुक्यातील १४०० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. तर दोन्ही महिन्यांतील पावसाने १,२७३ शेतकऱ्यांची ६९५ हेक्टर बागायती व ४६,२२६ शेतकऱ्यांची ३५, ६८० हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत मदतीची घोषणा केली आहे.

त्यामध्ये फक्त कोरडवाहू शेतकऱ्यांचा समावेश असून, बागायती व फळबागांच्या शेतकऱ्यांसंदर्भात मदतीचा कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ३३ टक्के नुकसानीचा निकष कायम असून दोन हेक्टर व त्यावरील शेतकरी, असेही वर्गीकरण करण्यात आले आहे. हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत देण्यात येणार आहे. सरकारने घोषणा केली असली, तरी अद्याप अध्यादेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनस्तरावर केवळ नुकसानीची गोळाबेरीज जमा होऊ लागली आहे. मदत निधीसाठी बराच काळ प्रतीक्षा करण्याची वेळ येणार आहे.

जिल्ह्यातील एकूण नुकसान

शेतीचा प्रकार : शेतकरी संख्या : हेक्टर क्षेत्र

कोरडवाहू : २,११,३४६ : २,०४,७८८

बागायती : १,२७३ : ६९५

फळबागा : ४६,२२६ : ३५,६८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com