एक्स्प्रेस धावताहेत कासवाच्या गतीने !

भारतातल्या निम्म्या मेल/ एस्क्प्रेस गाड्या उशिराने धावल्या असल्याचं कॅगच्या अहवालात समोर आलंय. या अहवालावर नुकतीच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत चर्चा झालीय.
Over 50 per cent mail, express trains ran late: CAG
Over 50 per cent mail, express trains ran late: CAGAgrowon

आपण भारतीय वेळ पाळण्याबाबत किती सावध असतो. आजच काम उद्यावर अन उद्याचं काम परवावर, अशी आपली रीत असते. त्यामुळं 'कल करेसो आज कर आज करेसो अभी पल मे प्रलय होगा बहुरी करोगे कब' या हिंदीतील उक्तीला आपल्याकडं 'कल देखेंगे यार' अशा भावनेनं झिडकारलं जातं. ही आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीचीच नव्हे तर आपल्या राज्यसंस्थेची अन सगळ्या व्यवस्थेची खासियत बनलीय. याला भारतीय रेल्वे तरी अपवाद कशी ठरेल ?

आता एक्स्प्रेस गाडी म्हणल्यावर ती कशी राईट टायमावर पोहचेल, असा अर्थ निघतो की नाही ? प्रत्यक्षात भारतातल्या निम्म्याहून अधिक एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावत असतात, असं सांगितलं तर ! बसेल तुमचा विश्वास ? पण हे अगदी खरंय. हे आम्ही नाही तर भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) सांगताहेत.

भारतातल्या निम्म्या मेल/ एस्क्प्रेस गाड्या उशिराने धावल्या असल्याचं कॅगच्या अहवालात समोर आलंय. या अहवालावर नुकतीच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत चर्चा झालीय. कॅगने त्यासाठी २०१६-२०१७, २०१७-२०१८ आणि २०१८-२०१९ अशा तीन वर्षांतील गाड्यांचं वेळापत्रक अन त्यांनतर प्रत्यक्षात त्या गाड्यांची वाहतुकीची प्रत्यक्षातील वेळ तपासलीय.

या तीन वर्षांत भारतीय रेल्वेच्या १३ लाख १५४५६ मेल/ एक्स्प्रेस गाड्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यात केवळ २९. ६४ टक्के एक्स्प्रेस गाड्या वेळेवर पोहचल्यात. केवळ २० टक्के गाड्या आपल्या निर्धारित वेळेपूर्वी आल्यात. उर्वरित गाड्यांचे वेळापत्रक केवळ शोभेपुरतेच ठरल्याचं या अहवालातून समोर आलंय.

या अहवालात या एक्स्प्रेस गाड्या कशामुळे उशिरा धावल्या? कोणत्या वर्षांत किती गाड्या उशिराने धावल्यात? त्यामागची कारणे काय होती? अशी बरीच सविस्तर माहिती नमूद करण्यात आलीय.

आता तुम्ही म्हणाल यात नवल ते काय ? रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक निर्धारित वेळेवर नसतं, त्यात क्रॉसिंग, सिग्नल्स, वारा, पाऊस, महापूर अशा अनेक भानगडी असतात. तसेच प्रवासी वाहतुकीसाठी , माल वाहतुकीसाठी रेल्वे कसे योगदान देत असते, असेही सांगितलं जाईल. हे सगळं मान्यच आहे. म्हणून तर किमान एक्स्प्रेस अशी नाव असणाऱ्या गाड्या तरी किमान वेळापत्रकानुसार धावाव्यात असं म्हणणं असतं ना ! शिवाय कृषी मालाच्या वाहतूकितीला मोठा हिस्सा हा रेल्वेच्या खात्यात जातो.

केवळ प्रवासी नव्हे तर माल वाहतुकीचे खात्रीचे परवडणारे माध्यम म्हणून रेल्वेचे योगदान कोणीच नाकारत नाही. मात्र किमान ज्या गाड्यांना एक्स्प्रेस संबोधलं जातं, त्या गाड्यांनी तरी वेळापत्रक पाळावं एवढीच या कॅगच्या अहवालानिमित्त सर्वसामान्यांची अपेक्षा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com