Sugarcane Transportation : ओव्हरलोड ऊस वाहतूक धोकादायक

राज्यातील सर्वच साखर कारखान्यामध्ये गळीत हंगामाला सुरूवात झाली आहे. कारखान्यासाठी ऊसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाड्या यांची रस्त्यांवर असलेली वर्दळ वाढली आहे.
Sugarcane Transportation
Sugarcane Transportation Agrowon

पिंपळगाव बसवंत ः राज्यातील सर्वच साखर कारखान्यामध्ये गळीत हंगामाला (Crushing Season) सुरूवात झाली आहे. कारखान्यासाठी ऊसाची वाहतूक (Sugarcane Transportation ) करणारे ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाड्या यांची रस्त्यांवर असलेली वर्दळ वाढली आहे. यातच अनेक ट्रॅक्टर, ट्रॅक हे त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक लोड भरत ऊसाची वाहतूक करत आहे. मात्र यांच्याकडून वाहतुकीचे सर्रास उल्लंघन होत असल्याने ऊसाची ही वाहतूक प्रवासी, वाहनचालक यांच्यासाठी जीवेघेणी ठरणारी आहे. अतिभारामुळे ट्रॅक्टर रस्त्यात नादुस्त होत असून थांबल्याने रहदारीला अडथळा ठरत आहे. याचाच प्रत्यय सोमवारी (ता.७ ) चिंचखेड चौफुलीवरील उड्डाणपूल जवळ आला. याठिकाणी महामार्गावर घडला. उसाची ट्रॉली उलटली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
 

Sugarcane Transportation
Sugarcane Transportation : ओव्हरलोड ऊसवाहतुकीस प्रति टन दोन हजार रुपये दंड

निफाड तालुक्यात यंदा साडे नऊ हजार हेक्टरवरील उसाची गळीत हंगामासाठी तोडणी सुरू आहे. तोडणी केलेले ऊस ट्रॉलीतून भरून ट्रॅक्टरने साखर कारखान्यात पाठविला जात आहे. एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉलीची जोडणी करून उसाची वाहतूक सुरू आहे. चालक रस्त्याच्या अगदी मध्यभागातून ट्रॅक्टर भरधाव चालवीत आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यावरून दुसऱ्या वाहनचालकांना जाण्यासाठी रस्ता मिळत नाही आहे. पिंपळगाव शहरात निफाड फाट्यावरवरून जाणारे उसाच्या ट्रॉली इतर नागरिकांना धडकी भरवीत आहे. यामुळे वाहतूक कोंडीत अजून भर पडत आहे. तर मुंबई-आग्रा महामार्ग व औरंगाबाद महामार्गावरही हे ट्रॅक्टर सुसाट धावत असून वाहतूक नियमांची पायमल्ली सुरू आहे. कुठल्याही ट्रॅक्टर यांना रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्यावेळी या वाहनांचा अंदाजही इतर चालकांना येत नसल्याने अपघातात वाढ होत आहे.

Sugarcane Transportation
Sugarcane Transportation : ओव्हरलोड वाहतुकीविरोधात ‘बळीराजा’चा एल्गार

दिडोंरी तालुक्यात कादवा, निफाडमध्ये रासाका, नगर, अकोले, कोपरगाव आदी भागातील साखर कारखान्यांना निफाडमधून ऊस जातो. त्यामुळे दोन्ही महामार्गावर ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची दिवसभर वर्दळ सुरू असते. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरचे अनेक चालक एकाच हेडलाईटच वापर करतात. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांची फसगत होत आहे. यातच जादा आर्थिक फायद्यासाठी ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात उसाची वाहतूक होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com