Maharashtra Crisis: शिंदे गटाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला हात लावलेला नाही. एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे मूळ शिवसेना (Shivsena) आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारिणी घोषित करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
Shinde & Thackeray
Shinde & ThackerayAgrowon

शिवसेनेचे बंडखोरे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत नवीन कार्यकारणी जाहीर केली. ज्यात शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला हात लावलेला नाही. एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे मूळ शिवसेना (Shivsena) आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारिणी घोषित करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

शिंदे गटाने नेतेपदी रामदास कदम (Ramdas Kadam) आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. या दोघांचीही काही तासांपूर्वीच शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणाखाली हकालपट्टी करण्यात आली होती. शिंदे गटाने उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड केली.

दरम्यान सोमवारी मुंबईत राष्ट्रपतिपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यांनतर ट्रायडंट हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने स्वत:ची कार्यकारिणी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या १९ पैकी १४ खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावली. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांचे नाव निश्चित करण्यात आले असून तसे पत्र मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून लोकसभेत दिले जाणार असल्याची चर्चा आहे. सध्या लोकसभेतील गटनेतेपदी विनायक राऊत असून ते ठाकरे यांचे निष्ठावन्त आहेत.राऊत यांच्या जागी लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी शेवाळे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी शिंदे तातडीने दिल्लीत जाणार असल्याची चर्चा आहे.

Shinde & Thackeray
Maharashtra Farmer: महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू: मुख्यमंत्री

मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे १४ खासदार शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू होती. राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना समर्थन देण्याची मागणी करत शिवसेनेच्या खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com