नेमळ्यात गव्यांकडून भातपिकाचे नुकसान

जिल्ह्यातील नेमळे (ता. सावंतवाडी) गावात गव्यानी शेतकऱ्यांना अक्षरशः हैराण केले आहे. ३० ते ३५ गव्यांच्या कळपाने गावातील भात, नाचणी, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गव्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाल आहे.
Paddy
PaddyAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नेमळे (ता. सावंतवाडी) गावात गव्यानी (Wild Cow) शेतकऱ्यांना अक्षरशः हैराण केले आहे. ३० ते ३५ गव्यांच्या कळपाने (Gava Herd) गावातील भात (Paddy Damage), नाचणी, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गव्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाल आहे.

Paddy
Crop Damage : ऑगस्टमधील नुकसानीचे ४८ टक्के पंचनामे उरकले

जिल्ह्यात गव्यांचे प्रमाण वाढत असून त्यांचे उपद्रवमूल्यदेखील वाढताना दिसत आहे. आतापर्यंत डोंगर, जंगल भागानजीकच्या गावांतील शेतीचे नुकसान गवे करीत होते. परंतु आता सर्वच गावांमध्ये गव्यांचे कळप पोहोचले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील नेमळे गावात तब्बल ३० ते ३५ गव्यांच्या कळपाचा वावर आहे. नेमळे गावकर-कुंभारवाडी, फौजदारवाडी, एरंडवाकवाडी, धारकरवडी, पाटकरवाडी, गोरख्याचे गाळू या परिसरात गव्यांच्या कळपाचा वावर असतो. लागवड केलेले भातपीक, नाचणी पिकात घुसून गवे शेतीचे नुकसान करतात.

Paddy
Paddy : सोळा लाख क्विंटलनी वाढली धान खरेदी मर्यादा

एकदा शेतीत गव्यांचा कळप घुसल्यानंतर पीक पूर्ण फस्त केल्याशिवाय ते बाहेरच पडत नाही. सायकांळी उशिरा किंवा पहाटे लवकर गवे शेतीचे नुकसान करतात. त्यातच हाकलण्याचा प्रयत्न केल्यास ते हल्ला करण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतीचे नुकसान होत असतानादेखील शेतकरी काहीच करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले. वन विभागाकडून प्रतिगुंठा ३०० रुपये भरपाई दिली जाते. वन विभागाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com