Paddy Harvesting : सिंधुदुर्गमध्ये भातपीक कापणीला वेग

जिल्ह्यात ३० टक्के कापणी पूर्ण
 Paddy Harvesting
Paddy HarvestingAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी ः परतीचा पाऊस थांबल्यानंतर जिल्ह्यात आता भातपीक कापणीला (Paddy Harvesting) वेग आला आहे. शेतकरी दिवसरात्र कापणीच्या कामात गुंतले असून आतापर्यंत ३० टक्के कापणीचे काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी भातपीक (Paddy Crop) जमिनीवर पडल्यामुळे कापणीला विलंब होत आहे.

 Paddy Harvesting
Paddy Harvesting : भात कापणी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस भातपीक परिपक्व झाले होते. परंतु सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना भातपीक कापणी करता आली नव्हती. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिपक्व झालेल्या भातपिकाच्या लोंबी जमिनीवर कोसळल्या तर पावसाचे पाणी लोंबीवर साचल्याने भातपिकाला कोंब येण्याचे प्रकार झाले आहेत; मात्र परतीचा पाऊस थांबल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातपीक कापणीला सुरुवात केली आहे.

 Paddy Harvesting
Paddy Harvesting : भात कापणी वेळवर होणे गरजेचे

सध्या भातपीक कापणी वेगाने सुरू असून भातपीक मळे शेतकऱ्यांनी गजबजलेले दिसून येत आहेत. जिल्ह्यात सरासरी ६० हजार हेक्टरवर भातपीक लागवड आहे. त्यापैकी गेल्या सहा-सात दिवसांत ३० टक्के कापणी पूर्ण झाली आहे. ८० टक्के शेतकरी अजूनही पांरपरिक पद्धतीने भातपीक कापणी करतात. उर्वरित २० टक्के शेतकरी यंत्राद्वारे कापणी करतात. अनेक भागांत भातपिकांमध्ये पाणी साचलेले असल्यामुळे तेथे यंत्राचा वापर होत नाही.

 Paddy Harvesting
Paddy Harvesting : परतीच्या पावसामुळे भातकापणी लांबणीवर

दरम्यान, भात कापणी उशिराने सुरू झाल्यामुळे कापणी पूर्ण व्हायला आणखी पंधरा दिवस लागतील, असा अंदाज आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी या भागांतील भात कापणी दहा ते बारा दिवसांत पूर्ण होईल; मात्र कुडाळ तालुक्यात पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com