Paddy Crop : धान उत्पादक शेतकऱ्यांना हवा प्रतिहेक्टर २० हजारांचा बोनस

धान विक्रीच्या आधारे न देता सरसकट सर्व शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर २०,००० रुपयांप्रमाणे थेट खात्यात जमा करावा
Paddy Producers
Paddy ProducersAgrowon

गोंदिया : धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करा व तो धान विक्रीच्या आधारे न देता सरसकट सर्व शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर २०,००० रुपयांप्रमाणे थेट खात्यात जमा करावा, अशी मागणी माजी आमदार भेरसिंह नागपुरे (Bharsingh Nagpure) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadnvis) यांच्याकडे केली आहे.

Paddy Producers
Paddy Harvesting : सिंधुदुर्गात नवरात्रानंतर भातकापणी

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार भेरसिंह नागपुरे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. निवेदनानुसार, धान उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.

Paddy Producers
Paddy Advisory : भात सल्ला

पूर्व विदर्भासह राज्याच्या सर्वच भागात धान उत्पादक शेतकरी यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. त्याची वेळीच दखल घेत धान उत्पादकांना उत्पादन खर्चाच्या प्रमाणात दर मिळाला पाहिजे.

Paddy Producers
Paddy : भातपिकाला संततधारेचा धोका

शासनाने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी याकरिता धान विक्रीवर बोनस देण्याचे जाहीर केले आहे. मात्र छोट्या व सीमांत शेतकऱ्यांना या बोनसचा लाभ मिळत नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांना धान विक्रीच्या आधारे बोनस देत असल्यामुळे अनेक लहान शेतकरी हे बोनसच्या रकमेपासून वंचित राहतात.

छोटे शेतकरी धान कापणीनंतर आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न पाहता आर्थिक गरज भागवण्यासाठी व्यापाऱ्यांकडे हमीभाव केंद्र सुरू होण्याआधीच आपल्या धानाची विक्री करतात. अशा गरजू शेतकऱ्यांना बोनस पासून वंचित राहावे लागते, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com