Crop Damage : सिंधुदुर्गमध्ये भात शेतीवरील संकट गडद

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस सुरू असून रविवारी (ता. १६) दुपारनंतर जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वीज उपकरणांचे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह परतीचा (Heavy Rainfall) पाऊस सुरू असून रविवारी (ता. १६) दुपारनंतर जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वीज उपकरणांचे नुकसान झाले. दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे हजारो हेक्टर भातशेतीवरील (Paddy Damage) संकट अधिक गडद होऊ लागले असून शेतकरी चिंतातूर आहेत.

Crop Damage
Paddy Crop Damage : पावसामुळे भातशेती संकटात

दरम्यान, सायकांळी उशिरापर्यंत अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. पाच सहा दिवस जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. रविवारी दुपारनंतरदेखील जिल्ह्याच्या बहुतांश भागांत परतीच्या पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत आहेत.

Crop Damage
Crop Advisory : सोयाबीन, कापूस, तूर पिकाची काळजी कशी घ्याल?

सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, देवगड यासह विविध भागांना परतीच्या पावसाने झोडपून काढले. विजांमुळे अनेक घरांतील वीज उपकरणांचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर भातशेती संकटात सापडली आहे. भातपिकांची लोंबी जमिनीवर पडू लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसागणिक वाढू लागली आहे.

पावसाचा तडाखा बसलेल्या भागातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विजांमुळे वैभववाडीतील एका ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होऊन तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता. सायकांळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

महावितरणचे मोठे नुकसान

गेल्या चार-पाच दिवसांपासून विजांच्या कडकडाटांसह सुरू असलेल्या पावसामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही भागांतील ट्रान्सफॉर्मर वीज पडून नादुरुस्त झाले आहेत.

भातशेतीचे नुकसान अटळ

जिल्ह्यातील ८० टक्के भातपीक कापणीच्या स्थितीत आहे. या पिकांची कापणी चार-पाच दिवसांपूर्वी होणे आवश्यक होते. या भातपिकाचा दाणा आता हळूहळू गळण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय काही ठिकाणी भातपीकच कोसळून पडू लागले आहे. त्यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com