Paddy Harvesting : पुरंदर तालुक्यात भात काढणी, झोडणी, मळणी अंतिम टप्प्यात

पुरंदर तालुक्याच्या किल्ले पुरंदरभोवती घेऱ्यात व डोंगरी भागात सुमारे १ हजार २०८ हेक्टर क्षेत्रात भाताचे आगार आहे. यंदा प्रारंभी मॉन्सूनच्या पावसास उशीर झाल्याने रोपे टाकणे व त्याची पुनर्लागण विलंबाने झाली. त्यामुळे १ हजार १०६ हेक्टरवरच रोपांची लागण झाली.
Paddy Harvesting
Paddy HarvestingAgrowon

सासवड, जि. पुणे ः पुरंदर तालुक्याच्या किल्ले पुरंदरभोवती घेऱ्यात व डोंगरी भागात सुमारे १ हजार २०८ हेक्टर क्षेत्रात भाताचे आगार (Paddy Hub) आहे. यंदा प्रारंभी मॉन्सूनच्या (Monsoon) पावसास उशीर झाल्याने रोपे टाकणे व त्याची पुनर्लागण विलंबाने झाली. त्यामुळे १ हजार १०६ हेक्टरवरच रोपांची लागण झाली. पुढे पाऊस पुरेसा झाला, तरी पीक निसवताना व पिकाच्या फुलोऱ्याच्या काळात परतीचा पाऊस लांबल्याने यंदा विलंबाने सुरू झालेली भातकाढणी (Paddy Harvesting) आता अंतिम टप्प्यात आली आहे. तर, उत्पादकतेत घटीचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.

Paddy Harvesting
Paddy MSP : शेतकऱ्यांचा भात हमीभावाने घेण्याची मागणी

पुरंदर तालुक्यात हळवी भात काढणी मागच्या महिना अखेरच पूर्णत्वाला गेली. तर, गरवी भात काढणी आता ९० ते ९५ टक्के झाली. भात काढणीचे काम या आठवड्यात शंभर टक्के पूर्ण होईल. तर त्यापुढील आठवड्यात झोडणी, मळणीची कामेही शंभर टक्के पूर्ण होतील. काळदरी, बहिरवाडी, मांढर, पानवडी, घेरा पानवडी, केतकावळे, देवडी भागात शंभर टक्के काढणी, झोडणी वा मळणी उरकली. नारायणपूर, पोखर, चिव्हेवाडी भागांत काही अंशी शेवटच्या टप्प्यातील झोडणी, मळणी सुरू आहे. मात्र सततच्या व अतिवृष्टीच्या पावसाने भात उत्पादकतेत घट जाणवत आहे, असा अंदाज आहे, असे शेतकरी बापू पापळ, रामदास पापळ, अंकुशबापू परखंडे, भाऊसाहेब भाडळे, दीपक भिसे, बाळासाहेब साबळे यांनी सांगितले.

Paddy Harvesting
Paddy Sowing : विठ्ठलवाडा येथे पेरीव धानाचा प्रयोग यशस्वी

उत्पन्न घटीची कारणे

- मॉन्सूनला विलंब झाल्याने रोपे टाकणे आणि लागवडीला विलंब.

- पावसाचा खंड आणि काढणी हंगामात झालेली अतिवृष्टी.

- भात मोहरत असताना पावसाची संततधार राहिली.

- मोहराची गळ झाल्याने दाणे भरण्यावर विपरीत परिणाम.

पुरंदरचा इंद्रायणी भाव खाणार

बाजारपेठेत एकूणच तीन महिन्यांत तांदळाच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील हवामानाचा भात उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील चव व सुवासामुळे इंद्रायणी भात प्रसिद्ध आहे. तोही यंदा भाव खाणार, हे नक्की आहे. गतवर्षी ४८ ते ५० रुपयांचा किलोचा इंद्रायणीचा दर तीन महिन्यांपूर्वी ५० ते ५५ रुपयांच्या घरात होता. यंदा नुकसानीमुळे इंद्रायणीचा दर ५५ ते ६० रुपये राहील. तर तांदळात इंडम वाण ४० रुपये किलोमागे, कोलम ४५ ते ५० रुपये राहील, असा अंदाज भात उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com