Paddy Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातकापणी ९० टक्के पूर्ण

जिल्ह्यातील ९० टक्के भातकापणी पूर्ण झाली असून उर्वरित दहा टक्के कापणी येत्या आठ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Paddy Harvesting
Paddy Harvesting Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ९० टक्के भातकापणी (Paddy) पूर्ण झाली असून उर्वरित दहा टक्के कापणी येत्या आठ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही तालुक्यांतील कापणी १०० टक्के पूर्ण झाली आहे.

Paddy Harvesting
Paddy Harvesting : भातझोडणीच्या कामांना जिल्ह्यात वेग

खरीप हंगामात जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर भातपीक लागवड केली जाते. यावर्षी नवरात्रोत्सव कालावधीतच भातपीक परिपक्व झाले होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भातपीक कापणीला सुरुवात करण्याच्या तयारीत शेतकरी असताना परतीचा पावसाचा जोर वाढला. सलग दहा ते पंधरा दिवस परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यानंतर देखील परतीचा पाऊस सुरूच होता. या पावसाने अनेक भागात भातपिकाचे नुकसान देखील झाले. परतीचा पाऊस लांबल्यामुळे कापणीला उशिराने सुरुवात झाली. २० ऑक्टोबरनंतर कापणीला गती प्राप्त झाली.

गेले २५ दिवस जिल्ह्यातील शेतकरी रात्रंदिवस भातपीक कापणी, झोडणी, मळणीची काम करीत आहेत. जिल्ह्यातील सरासरी ९० टक्के कापणी पूर्ण झाली आहे. कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांतील भातकापणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. परंतु अधिक क्षेत्र लागवडीखाली असलेल्या कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांत काही प्रमाणात भातपिकांची कापणी शिल्लक आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत कापणीचे काम पूर्ण होईल, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात आजपासून पावसाची शक्यता असल्यामुळे भात उत्पादक शेतकरी सतर्क झाला आहे. कापणी केलेले भात एकत्र करून ठेवण्याचे काम केले जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com