Paddy Harvesting : वन कर्मचाऱ्यांच्या पहाऱ्यात धानकापणी

वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. मानव-वन्यजीव संघर्ष हा शिगेला पोहोचला आहे.
Forest Department
Forest DepartmentAgrowon

मूल, चंद्रपूर : वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी (Farmer) वर्गात भीतीचे वातावरण आहे. मानव-वन्यजीव संघर्ष हा शिगेला पोहोचला आहे. त्याचे सावट आता धानकापणीवर पडत आहे. त्यामुळे वनालगत असलेल्या शेतीतील धानकापणीवर वनविभागाचा (Forest Department) खडा पहारा सुरू आहे. तुर्तास येथील धानकापणी सध्या सुरळीत सुरू असल्याचे चित्र आहे. तालुक्यात वाघांची दहशत निर्माण झाल्याने वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.

Forest Department
Crop Insurance : विम्यासाठी ‘स्वाभिमानी’ची कृषी कार्यालयावर धडक

धान उत्पादक मूल तालुका हा वनव्याप्त आहे. तालुक्याला बफर, प्रादेशिक आणि वनविकास महामंडळाचे जंगल क्षेत्र लाभले आहे. तिन्ही जंगल क्षेत्रामध्ये वाघ, बिबट, रानडुकर, अस्वल यांच्यासह इतर वन्यप्राण्यांचा मोठा संचार आहे. मूल, कोसंबी, ताडाळा, चिचाळा, कवडपेठ, कांतापेठ, केळझर, जानाळा, आगडी ही गावे प्रादेशिक वनक्षेत्रात येतात. तर, करवन, काटवन, मारोडा, डोनी, फुलझरी ही गावे बफर झोन क्षेत्रात येतात. या दोन्ही वनक्षेत्रांत वाघांची संख्या अधिक आहे. वाघांचा अधिवास गावालगत अधिक वाढला.

Forest Department
Paddy Straw : पेंढ्यांना योग्य दर देण्याची मागणी

त्यामुळे वनव्याप्त धान शेतीच्या परिसरात वाघांचे हल्ले वाढले. जंगलात जनावरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यांवर वाघाचे हल्ले वाढले. तसेच मानवावरसुद्धा हल्ला होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी आणि वन परिसरात असलेल्या धान शेतीतील धान कापणी सुरक्षित होण्याच्या दृष्टीने वनविभागाकडून वनरक्षकाच्या माध्यमातून पहारा देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

सध्या तालुक्यात धान कापणीचा हंगाम सुरू आहे. मागील काही महिन्यांत मानव-वन्यजीव संघर्ष अधिक वाढल्याने वनविभागाच्या माध्यमातून प्रादेशिक आणि बफर क्षेत्रातील गावांत जनजागृतीचेसुद्धा काम करण्यात येत आहे.

प्रादेशिक वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील चिचाळा, कवडपेठ, मूल जवळील रानतलाव परिसरातील शेतीवर जावून धानकापणी सुरू असताना वनरक्षक खडा पहारा देत आहेत. जेणेकरून मजुरांना धानकापणी सुरळीत आणि सुरक्षित करता यावी. मानवावरील वन्यप्राण्यांचे हल्ले रोखता यावे, हा त्यामागचा उददेश आहे.- प्रियंका वेलमे, वनपरीक्षेत्राधिकारी, चिचपल्ली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com