Sugarcane seeds : पाडेगाव ऊस केंद्रात मिळणार दर्जेदार ऊस बेणे

पाडेगाव येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रामधून मूलभूत ऊस बेणे विक्री सोमवारपासून (ता. ३) सुरू झाली.
Sugarcane Seeds
Sugarcane SeedsAgrowon

पुणे : पाडेगाव येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (Mahtma Phule Krushi Vidypeeth) मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रामधून मूलभूत ऊस बेणे (Sugarcane Sets) विक्री सोमवारपासून (ता. ३) सुरू झाली. सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे (Someshwar Co-operative Sugar Mill) चेअरमन पुरुषोत्तम जगताप (Purushottam Jagtap) यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रजचे प्रगतिशील शेतकरी राहुल भोकरे यांना ऊस बेणे मळ्याची पहिली मोळी देवून विक्रीस सुरुवात करण्यात आली.

Sugarcane Seeds
Sugar Mill : श्री दत्त कारखाना एकरकमी एफआरपी देणार

साखर कारखाने आणि शेतकऱ्यांनी या केंद्रातील बियाणे वापरावेत, असे आवाहन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर यांनी केले. डॉ. रासकर म्हणाले, ‘‘पाडेगाव संशोधन केंद्राने २५ हेक्टर क्षेत्रावर उसाचे बियाणे मळे तयार केले आहेत. उसाच्या मूलभूत बियाण्यांपासून कारखान्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पायाभूत बेणे मळे तयार करून शेतकऱ्यांना पुरवठा करता येईल.

Sugarcane Seeds
Sugar Mill : ‘पांडुरंग’ची गाळप क्षमता प्रतिदिन दहा हजार टनापर्यंत वाढवणार

प्रामुख्याने ‘को ८६०३२’, ‘फुले २६५’, ‘फुले १०००१’, ‘फुले ०९०५७’, ‘को ११०१५,’ ‘फुले ११०८२’ या वाणांचे बियाणे उपलब्ध होईल. ऑक्टोबर महिन्यात ‘को ८६०३२’ आणि ‘फुले २६५’ या वाणांचे बियाणे मिळेल. डिसेंबर महिन्यात उरलेल्या वाणांचे बियाणे मिळेल. या केंद्राने विकसित केलेला आणि सुरू आणि पूर्वहंगामासाठी शिफारस केलेला ‘फुले ११०८२’ हा लवकर तयार होणारा वाण आहे.

Sugarcane Seeds
Sugar Export : साखर निर्यात परवानगीचा निर्णय सहा ऑक्टोबरनंतर शक्य

कमी कालावधीत १० महिन्यांतच साखर तयार होत असल्याने गळिताच्या सुरुवातीला अधिक साखर उताऱ्यासाठी हा वाण फायदेशीर आहे.’’ चालू वर्षी ‘फुले १५०१२’ या वाणाची शिफारस करण्यात येईल. त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याची विक्री डिसेंबरपासून सुरू होईल. हा वाण ‘को ८६०३२’ पेक्षा अधिक ऊस आणि साखर उतारा देणारा आहे. ‘

फुले २६५’ पेक्षा १ युनिटने साखर उतारा मिळेल. सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली लागवडीबरोबर खोडव्यासाठी सुद्धा या वाणाची शिफारस केली आहे. यंदा १.२५ कोटी दोन डोळा टिपरी बियाणे विक्रीस उपलब्ध होईल. याची लागवड एक डोळा पद्धतीने केल्यास १२५० हेक्टरवर करता येईल.

त्यानंतर पहिल्या वर्षी हे बियाणे २५ हजार हेक्टर व दुसऱ्या वर्षी ५ लाख हेक्टरवर करता येईल. त्यानंतर पहिल्या वर्षी हे बियाणे २५ हजार हेक्टर व दुसऱ्या वर्षी ५ लाख क्षेत्रावर वापरता येईल. अशा प्रकारे दरवर्षी प्रत्येक कारखान्याला ३० टक्के क्षेत्रावर नवीन बेणे वापरता येईल. बेणे बदलामुळे उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.

...इथे करा संपर्क

बियाण्याच्या दोन डोळ्यांच्या १००० टिपरींचा तोडणी आणि भरणीसह विक्रीचा दर रु. १७५० असा आहे. नवीन वाण ‘फुले ११०८२’ आणि ‘पीडीएन १५०१२’ या वाणांचा १००० टिपरीचा विक्रीचा दर रु. ५१५० रुपये आहे. बियाण्यासाठी बियाणे विक्री अधिकारी डॉ. राजेंद्र भिलारे (मो. ८२७५४७३१९१) व डॉ. दत्तात्रेय थोरवे (मो. ९८८१६४४५७३) यांच्याशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा.

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने प्रसारित केलेल्या ऊस वाणांच्या बेण्यांचा सर्व साखर कारखान्यांनी नवीन लागवडीसाठी उपयोग करावा.

- डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com