पंचायतराज समितीचा नगर जिल्हा दौरा स्थगित

पाच वर्षांतून एकदा पंचायत राज समिती येते. शासनाच्या निधीचा योग्य विनियोग झालाय काय, योजनांची प्रभावी अंमलबजावणी झालीय का आदीबाबत समितीकडून तपासणी केली जाते.
Panchayat Raj Samiti
Panchayat Raj SamitiAgrowon

नगरः नगर जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषदेने केलेल्या सरकारी योजनांची अंमलबजावणी तपासण्यासाठी पंचायतराज समिती (Panchayat Raj Samiti) येणार होती. समितीचा दौरा स्थगित केला आहे. शासनाच्या अवर सचिवांकडून तसे पत्र जिल्हा परिषदेला पाठवले आहे. पत्रात कारण दिले नसले, तरी सध्या राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत. समितीमधील काही आमदार बाहेर असल्याने समितीचा दौरा स्थगित केला असल्याचे बोलले जात आहे. दौरा स्थगित झाल्याने जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ थांबली आहे.

नगर जिल्ह्यात पंचायत राज समितीचा (Panchayat Raj Samiti) दौरा प्रारंभी २३ जूनला नियोजित होता. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारीही केली होती. नंतर त्यात बदल होऊन २८ पासून तीन दिवस दौरा निश्‍चित झाला होता. पाच वर्षांतून एकदा पंचायत राज समिती येते. शासनाच्या निधीचा योग्य विनियोग झालाय काय, योजनांची प्रभावी अंमलबजावणी झालीय का आदीबाबत समितीकडून तपासणी केली जाते. त्यामुळे समितीला सामोरे जाताना सर्व फायल व्यवस्थित असाव्यात यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असते.

Panchayat Raj Samiti
पीकविमा १५ जुलैपासून चालू करण्याचा प्रयत्न

याशिवाय एका वेगळ्या कारणानेही समितीचा दौरा प्रत्येक वेळी चर्चेत असतो. तसाच या वेळीही चर्चेत होता. गेल्या महिनाभरापासून पंचायत समिती येणार असल्याने जिल्हा परिषदेत मोठी धावपळ सुरू होती. अधिकारी, कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही काम करत होते. मात्र शासनाने जिल्हा परिषदेला (ZP) पत्र पाठवून दौरा स्थगित झाल्याचे सांगितले आहे. पत्रात स्थगितीचे कारण दिले नसले तरी सध्या राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत.

समितीमधील काही आमदार बाहेर असल्याने समितीचा दौरा स्थगित केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अहवाल तसेच इतर तयारी करण्याला अधिक वेळ मिळाला आहे. सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. खरिपाची तयारी करावी लागत आहे. आरोग्याचे अनेक प्रश्‍न उद्‍भवत आहेत. अशा घाईच्या वेळेत अधिकारी, कर्मचारी पंचायत राज समितीसाठी (Panchayat Raj Samiti) तयार करण्याच्या अहवालात व्यस्त होते. त्यामुळे कामे खोळंबली होती. ती आता मार्गी लावण्यात येणार आहे. तसेच बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी जाण्याचे थांबविण्यात आले होते. ते आता जाऊ शकणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com