कॉरिडॉरला विरोधासाठी सर्व पक्षीय पंढरपुरकरांचा मोर्चा

१९०४ पासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात तीन वेळा सामान्य नागरिकांची घरे ताब्यात घेऊन विकासकामे करण्यात आली आहेत.
Agriculture
Agriculture Agrowon

पंढरपूर, जि. सोलापूर ः १९०४ पासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (Vithhal Rukmini Temple) परिसरात तीन वेळा सामान्य नागरिकांची घरे ताब्यात घेऊन विकासकामे (Development Work) करण्यात आली आहेत. आता चौथ्यांदा कॉरिडॉरच्या नावाखाली पुन्हा येथील नागरिकांना बेघर करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचा आरोप मंदिर परिसर बचाव संघर्ष समितीचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी केला.

Agriculture
Soybean Rate : सोयाबीनचे दर का नरमले?

पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा केल्यापासून यास स्थानिकांनी विरोध सुरू केला आहे. यासाठी मंदिर परिसर बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून, समितीच्या वतीने गुरुवारी (ता. १७) येथील एक हजार नागरिकांच्या हरकती प्रांताधिकारी गजानन गुरव, नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद माळी यांना देण्यात आल्या.

Agriculture
Soybean Rate : देशात १४५.५५ लाख टन सोयाबीन उपलब्धतेचा अंदाज

या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते व नगरसेवकांनी सहभागी झाले. निवेदन स्वीकारल्यानंतर प्रांताधिकारी गुरव यांनी नागरिकांच्या तीव्र भावना शासनास कळविण्याचे आश्‍वासन दिले. सोमवारी (ता.२१) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या समवेत आराखड्यासंदर्भात बैठक असून, येथे नागरिकांच्या सूचना मांडणार असल्याचे सांगितले.

बचाव समितीच्या मागण्या

पंढरपूरच्या पैलतीरावर, ६५ एकर किंवा चंद्रभागेवर भव्य उड्डाण पूल उभारून कॉरिडॉर करावा. विकासकामाबाबत आम्हीदेखील एक आराखडा बनविला असून, तो विभागीय आयुक्त यांना दाखविण्यासाठी बैठकीचे आयोजन करावे, आदी मागण्या वीर महाराज यांनी केल्या. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com