
श्रीपूर, जि. सोलापूर : (Solapur District) श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर (Pandurang co-operative Sugar Mill) कारखान्याचा नाम विस्तार करण्यास सभासदांनी गुरुवारी (ता. २९) दोन्ही हात उंचावून समर्थन दिले. त्यामुळे पांडुरंग कारखान्याचे नाव आता ‘कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना’ श्रीपूर असे असेल.
त्यामुळे सहकारातील डॉक्टर अशी ओळख असलेल्या परिचारक यांचे नाव आता सहकाराशी कायमस्वरूपी जोडले जाणार आहे. कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे,
कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, संचालक दिनकरराव मोरे, उमेश परिचारक, हरीश गायकवाड, दाजी पाटील यांच्यासह आजी-माजी संचालक उपस्थित होते. सभासदांच्या आग्रहाखातर कारखान्याच्या नावात बदल करण्याचा ठराव त्यांनी मांडला.
त्यास सभासदांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून त्याचे समर्थन केले. उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी उभे राहून ठरावाचे स्वागत केले. सभासदांच्या प्रश्नांना परिचारकयांनी उत्तरे दिली.
‘देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’
‘‘पांडुरंग कारखान्याची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. इतर कारखान्यांच्या आणि या कारखान्याच्या वार्षिक अहवालाची सभासदांनी तुलना करून बघावी. लेखापरीक्षणात पांडुरंग कारखान्याला सतत ‘अ’ वर्ग मिळाला आहे. ‘
अ’ वर्गासाठी २०० पैकी १६१ गुण प्राप्त होणे आवश्यक असते. परंतु ‘पांडुरंग’ला १८६ गुण मिळाले आहेत. आपल्या सगळ्यांच्या योगदानामुळेच आज पांडुरंग कारखाना देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना ठरला आहे,’’ असे परिचारक म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.